वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील मृद विज्ञान व कृषि
रसायनशास्त्र विभागास तुर्की येथील आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञा डॉ उल्फेत इरडाल व डॉ. गोनुल आयपिक यांनी भेट दिली व विभागातील
पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी शिक्षण
संचालक डॉ.
विलास पाटील,
प्राचार्य डॉ. धर्मराज गोखले, विभाग प्रमुख डॉ. टी. बी. तांबे, डॉ सय्यद इस्माईल आदीची प्रमुख उपस्थिती होती. तुर्कीच्या शास्त्रज्ञांनी विभागाच्या
प्रयोगशाळेस भेट देऊन
समाधान व्यक्त केले. विभागातील शिक्षण व संशोधनाविषयी डॉ सय्यद इस्माईल यांनी माहिती दिली. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना प्राध्यापक डॉ. उल्फेत म्हणाल्या की, पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी शिक्षण व संशोधन प्रामाणिकपणे कार्य केल्यास शेतकऱ्यांच्या
ब-याचश्या अडचणी दुर होऊ शकतील. शिक्षण संचालक डॉ. विलास पाटील यांनी युवकांनी नेतृत्व गुणांचा विकास करणे गरजेचे असुन पदव्युत्तर अभ्यासक्रमातील
विद्यार्थ्यांनी संशोधनावर भर द्यावा व संशोधनाचा उपयोग
शेतक-यांच उन्नतीसाठी करण्याचा त्यांनी सल्ला दिला. यावेळी विभागातील नवप्रवेशीत
प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्याचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ. पपीता गौरखेडे यांनी केले तर आभार डॉ. सुरेश वाईकर यांनी मानले. कार्यक्रमास विभागातील विद्यार्थ्यी डॉ अनिल धमक, डॉ महेश देशमुख, प्रा.
भाग्यरेखा गजभीये, प्रा. प्रभाकर अडसुळ, संतोष पिल्लेवाड, सदाशिव अडकीणे, एस.एम.
महावलकर आदीसह कर्मचारी आणि विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.