Pages

Tuesday, September 5, 2017

चांगले विद्यार्थ्यी घडवण्यासाठी प्राध्यापकांना अध्यापन कार्यक्षमता वृध्दींगत करणे गरजेचे....कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु

वनामकृवित पाच दिवसीय प्रशिक्षण कार्याक्रमाचे उद्घाटन
महाविद्यालयात चांगले विद्यार्थ्‍यी घडवयाचे असतील तर प्राध्‍यापकांना अध्‍यापनातील कार्यक्षमता वाढवावी लागेल, त्‍याकरिता सातत्‍याने प्रशिक्षणाची गरज लागते. प्राध्‍यापकांनी आपल्‍या अध्‍यापन कार्यावर पुर्णपणे लक्ष केंद्रीत करावे, असा सल्‍ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरुल यांनी दिला. हैद्राबाद येथील नॅशनल अॅकाडमी ऑफ अॅग्रीकल्‍चर रिसर्च मॅनेजमेंट (नार्म) व वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने नवनियुक्‍त प्राध्‍यापक व शास्‍त्रज्ञासाठी अध्‍यापन कार्यक्षमता व परिणामकारता वृध्‍दीसाठी पाच दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम दिनांक 4 ते 8 सप्‍टेबर दरम्‍यान आयोजन करण्‍यात आले असुन दिनांक 4 रोजी प्रशिक्षणाच्‍या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी नार्मचे संचालक मा. डॉ. चे श्रीनिवास राव, शिक्षण संचालक डॉ व्हि डी पाटील, प्राचार्य डॉ डि एन गोखले, डॉ डि थामी राजु, डॉ के एच राव, प्रशिक्षण समन्‍वयक डॉ आर डि आहिरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरुल पुढे म्‍हणाले की, प्राध्‍यापकांनी कृषि क्षेत्रातील अद्यावत संशोधनाचे ज्ञान अवगत करण्‍यासाठी संशोधन लेखांचे नियमित वाचन करावे, संशोधन लेख प्रसिध्‍द करावीत. यावेळी नार्मचे संचालक मा. डॉ. चे श्रीनिवास राव आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले की, नार्म संस्‍थेत राष्‍ट्रीय पातळीवरील प्रशिक्षक असुन याचा लाभ प्रशिक्षणार्थी प्राध्‍यापकांना अध्‍यापन कौशल्‍य वाढण्‍यास निश्चितच होईल.

शिक्षण संचालक डॉ व्‍ही डी पाटील यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. सदरिल प्रशिक्षणात विद्यापीठातंर्गत असलेल्‍या विविध महाविद्यालयातील नवनियुक्‍त 35 सहाय्यक प्राध्‍यापकांचा प्रशिक्षणार्थी म्‍हणुन समावेश आहे. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ आर डि आहिरे यांनी केले. सुत्रसंचालन डॉ एस एस मोरे यांनी केले तर आभार डॉ पी एस कापसे यांनी मानले. कार्यक्रमास प्राचार्य प्रा. विशाला पटणम, प्राचार्य डॉ अशोक कडाळे आदीसह विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी व‍ विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते.