मेळाव्यात
खरीप पिक परिसंवाद व कृषि प्रदर्शनीचेही आयोजन
वसंतराव
नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या 46 व्या वर्धापन दिनानिमित्त विस्तार
शिक्षण संचालनालय व कृषि विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने
खरीप शेतकरी मेळाव्याचे आयोजन दिनांक 18 मे शुक्रवार रोजी सकाळी 11.00 वाजता विद्यापीठातील
प्रशासकीय इमारती जवळील नवीन पदव्युत्तर वसतीगृह मैदानात करण्यात आले आहे.
मेळाव्याचे उदघाटन नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे उपमहानिदेशक (कृषि शिक्षण) मा. डॉ. नरेन्द्र सिंह राठौड यांच्या
हस्ते होणार असुन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु
हे राहणार आहेत. कार्यक्रमास विस्तार शिक्षण संचालक डॉ. पी. जी. इंगोले, शिक्षण
संचालक डॉ. व्ही. डी. पाटील, संशोधन संचालक डॉ. डी. पी. वासकर आदींची प्रमुख
उपस्थिती लाभणार आहे. मेळाव्याच्या खरीप पिक परिसंवादात खरीप पिक लागवड व व्यवस्थापन
तसेच शेती पुरक जोडधंदे याविषयावर विद्यापीठ शास्त्रज्ञ मार्गदर्शन करणार असुन शेतक-यांच्या
कृषि विषयक प्रश्न व शंकाचे शास्त्रज्ञ निरासरनही करणार आहेत. याप्रसंगी कृषि
प्रदर्शनीचेही आयोजन करण्यात आले असुन विद्यापीठ विकसित विविध तंत्रज्ञान आधारी
दालनासह शेती निविष्ठांचे खासगी कंपन्या व बचत गटाच्या दालनाचा समावेश राहणार
आहे. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यापीठ विकसित बियाणे विक्रीचे उदघाटनही
होणार आहे. सदरिल मेळाव्यास जास्तीत जास्त शेतक-यांनी उपस्थित राहावे, असे
आवाहन मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ पी आर देशमुख व जिल्हा अधिक्षक कृषि
अधिकारी श्री बी आर शिंदे यांनी केले आहे.