Pages

Tuesday, July 3, 2018

वनामकृवित शेळीपालन व रोपवाटीका व्‍यवस्‍थापन यावर कौशल्‍य विकास निवासी प्रशिक्षण संपन्‍न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विदयापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, विस्‍तार शिक्षण संचालनालय आणि कृषि तंत्रज्ञान व्‍यवस्‍थापन यंत्रणा (आत्‍मा), हिंगोली यांच्‍या संयुक्‍त विदयमाने ग्रामीण युवक व शेतकरी यांचे करिता शेती आधारीत / शेतीपुरक उत्‍पादन / प्रक्रिया व्‍यवसाय कौशल्‍य आधारीत प्रशिक्षण योजनेंतर्गत हिंगोली जिल्‍हयातील युवकांसाठी शेळीपालन आणि रोपवाटीका व्‍यवस्‍थापन या विषयांवर प्रत्‍येकी सहा दिवसाचे निवासी प्रशिक्षण दिनांक २५ ते ३० जून दरम्‍यान आयोजित करण्‍यात आले होते, यात ३० शेतक-यांनी सहभाग नोंदविला. शेतक-यांना प्रत्‍यक्ष प्रात्‍याक्षिकातून कौशल्‍यवृध्‍दी व्‍हावी म्‍हणून अभ्‍यासक्रमात ७० टक्‍के प्रात्‍याक्षिकावर भर देण्‍यात आला होता.
समारोपीय कार्यक्रम विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. प्रदीप इंगोले यांच्‍या अध्‍यक्षतेखाली पार पाडला, यावेळी विभाग प्रमुख डॉ. जी. एम. वाघमारे, डॉ. बी. एम. ठोंबरे, मुख्‍य विस्‍तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख, नाबार्डचे श्री. पी. एम. जंगम आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मार्गदर्शनात डॉ. प्रदीप इंगोले यांनी प्रशिक्षणातील माहिती व तंत्र प्रत्‍यक्षात अंमलात आणण्‍याचा सल्‍ला प्रशिक्षणार्थींना देऊन शेतकरी समुह स्‍थापनाचे आवाहन केले. प्रशिक्षणार्थीं सोपान शिंदे आणि श्रीधर राऊत यांनी प्रशिक्षणाबाबत समाधान व्‍यक्‍त करुन कौशल्‍य प्रत्‍यक्षात अमलात आणण्‍याचे आश्‍वासन दिले. मान्‍यवरांचे हस्‍ते प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र वितरीत करण्‍यात आले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक विस्‍तार कृषि विदयावेत्‍ता डॉ. यु. एन. आळसे यांनी केले तर सुत्रसंचालन डॉ एस जी पुरी यांनी मानले.
प्रशिक्षणात शेळीपालन याबाबतील विविध विषयांवर विभाग प्रमुख डॉ. बी. एम. ठोंबरे, डॉ. एस. जी. नरवाडे, डॉ. दिनेश चौहाण, डॉ. अे. टी. शिंदे, डॉ. डी. व्‍ही. बैनवाड यांनी मार्गदर्शन केले तर रोपवाटीका व्‍यवस्‍थापनातील विविध बाबींवर विभाग प्रमुख डॉ. जी. एम. वाघमारे, डॉ. आर. एस. बोराडे, डॉ. एम. एस. दडके, डॉ. विनोद शिंदे, डॉ. आर. एस. बरकुले, डॉ. बी. एस. कलालबंडी, प्रा. डी. डी. पटाईत, प्रा. अंशुल लोहकरे, प्रा. एस. पी.चव्‍हाण, श्री. एम. वाय. साळवे आदींनी आदींनी प्रात्‍यक्षिकाव्‍दारे मार्गदर्शन केले. नाबार्डचे श्री. पी. एम. जंगम व प्रकल्‍प अधिकारी रुपाली कानगुडे यांनी जिल्‍हा उदयोग केंद्राचे विविध उपक्रमाबाबत तर डॉ. एस. जी. पुरी यांनी उद्योजकता विकास व संभाषण कौशल्‍य याबाबत मार्गदर्शन केले.
प्रशिक्षणाचे आयोजन विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. प्रदीप  इंगोले यांच्‍या निर्देशानुसार व विस्‍तार कृषि विदयावेत्‍ता डॉ. यु. एन. आळसे यांच्‍या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण समन्‍वयक डॉ. एस. जी. पुरी यांनी यशस्‍वीपणे केले.