Pages

Tuesday, August 28, 2018

परभणी कृषि महाविद्यालयाची कु. रंगोली पडघन हिला रासेयोचा सर्वोत्‍कृष्‍ट स्‍वयंसेवक पुरस्‍कार

महाराष्‍ट्र शासनाचा राष्‍ट्रीय सेवा योजने अंतर्गत सन २०१७१८ साठीचा सर्वोत्‍कृष्‍ट स्‍वयंसेवक पुरस्‍कारासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या परभणी कृषि महाविद्याल याची विद्यार्थ्‍यींनी कु. रंगोली अरूण पडघन हिची निवड झाली असुन कार्यक्रम अधिकारी प्रशंसा प्रमाणपत्र पुरस्‍कारासाठी औंढा नागनाथ येथील एम. आय. पी. अन्‍नतंत्र महाविद्यालयातील क्रीडा शिक्षक प्रा. श्री खाजा अब्‍दुल खदीर यांची निवड झाली आहे. याबाबत दोघांचा विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण यांच्‍या हस्‍ते दिनांक २८ ऑगस्‍ट रोजी सत्‍कार करण्‍यात आला, यावेळी शिक्षण संचालक डॉ विलास पाटील, विद्यार्थ्‍यी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख, प्राचार्य डॉ डि एन गोखले, डॉ पपिता गौरखेडे, श्री अरूण पडघन, श्री डोईजड आदी उपस्थित होते. पुरस्‍काराबाबत अभिनंदन करतांना कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण म्‍हणाले की, विद्यार्थ्‍यी व कर्मचारी यांचा सन्‍मान हे विद्यापीठासाठी गौरवाची बाब असुन मुलीं विविध क्षेत्रात उत्‍कृष्‍ट कार्य करित आहेत. रासेयोनेच्‍या माध्‍यमातुन सामाजिक सेवा करण्‍याची विद्यार्थ्‍यांना संधी प्राप्‍त होते. सदरिल पुरस्‍कार हा रासेयो अंतर्गत नि:स्‍वार्थ भावनेने व निष्‍ठेने समाजाची सेवा करणा-यांना प्रोत्‍साहन मिळावे व त्‍यांचा सेवेचा यथोचित गौरव करण्‍याच्‍या दृष्‍टीने राज्‍य शासनाकडुन देण्‍यात येतो.