Pages

Tuesday, October 2, 2018

वनामकृवित महात्‍मा गांधी व लालबहादुर शास्‍त्री जयंती साजरी

येणारे वर्ष महात्‍मा गांधी जयंतीचे 150 वे वर्ष

विद्यापीठ परिसर व रेल्‍वे स्‍टेशन परिसरात राबविण्‍यात आली स्‍वच्‍छता मोहिम

देशाला शांतीचा व स्‍वच्‍छतेचा मंत्र देणारे राष्‍ट्रपिता महात्‍मा गांधी तसेच जवान व किसान यांचे समाजातील महत्‍वाचे स्‍थान असल्‍याची जाणीव करून देणारे महान व्‍यक्‍ती लालबहादुर शास्‍त्री यांच्‍या जयंती निमित्‍त त्‍याच्‍या चरित्रापासुन सर्वांनी प्रेरणा घ्‍यावी. स्‍वच्‍छता ही अविरत चालणारी प्रक्रिया असुन गेल्‍या चार वर्षापासुन कृषिचे विद्यार्थ्‍यी स्‍वच्‍छता मोहिमे हिरारिने सहभाग घेत आहेत. विद्यापीठ परिसर सुंदर, स्‍वच्‍छ, हरित व सुरक्षित करण्‍यासाठी सर्वांनी आग्रही असले पाहिजे, असे प्रतिपादन कुलगुरू मा. डॉ अशोक ढवण यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालयाच्‍या राष्‍ट्रीय सेवा योजना व राष्‍ट्रीय छात्रसेनेच्‍या वतीने दिनांक 2 ऑक्‍टोबर रोजी राष्‍ट्रपिता महात्‍मा गांधी व लालबहादुर शास्‍त्री यांची जयंती साजरी करण्‍यात आली, त्‍यावेळी कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानावरून ते बोलत होते. या वेळी शिक्षण संचालक डॉ विलास पाटील, प्राचार्य डॉ धर्मराज गोखले आदींची प्रमुख उपस्थिती होती. शिक्षण संचालक डॉ विलास पाटील आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले की, स्‍वच्‍छतेची सुरूवात स्‍वत: पासुन करावी. मनाची, शरीर व परिसर स्‍वच्‍छतेसाठी सर्वांनी प्रयत्‍न करावेत.
कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक प्रा विजय जाधव यांनी केले. सुत्रसंचालन अनिल येसे यांनी केले तर आभार विशाल सरोदे यांनी मानले. याप्रसंगी विद्यार्थ्‍यांनी शहरात स्‍वच्‍छता रॅली काढून विद्यापीठ परिसर व रेल्‍वे स्‍थानक परिसरात स्‍वच्‍छता केली तसेच येणारे वर्ष हे महात्‍मा गांधी जयंतीचे 150 वे वर्ष साजरे करण्‍यात येणार असुन त्‍यानिमित्‍त विद्यार्थ्‍यीनी 150 क्रमांकाचे मानवी प्रतिकृती तयार केली
कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी राष्‍ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ जयकुमार देशमुख, प्रा विजय जाधव, डॉ पपिता गौरखेडे, राष्‍ट्रीय छात्र सेनेचे छात्रसैनिक डॉ आशिष बागडे आदींसह स्‍वयंसेवक व छात्रसैनिकांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते.