Pages

Wednesday, October 24, 2018

मौजे बाभळी येथे रबी पिक शेतकरी मेळावा संपन्‍न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतील परभणी कृषि महाविद्यालय व कापुस संशोधन केंद्र यांच्‍या संयुक्‍त विद्यामाने ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत परभणी तालुक्‍यातील मौजे बाभळी येथे दिनांक 20 ऑक्‍टोबर रोजी रबी पिक शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन करण्‍यात आले होते. मेळाव्‍याच्‍या अध्‍यक्षस्‍थानी बाभळीचे सरपंच विठ्ठलराव पंढरे हे होते तर उदघाटक म्‍हणुन गंगाप्रसाद आनेराव हे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्‍हणुन वनस्‍पतीशास्‍त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ व्‍ही डी साळुंखे हे उपस्थित होते.
मेळाव्‍यात गंगाप्रसाद आनेराव यांनी विद्यापीठ तंत्रज्ञानाचा वापर करण्‍याचे आवाहन शेतकरी बांधवाना केले तर डॉ व्‍ही डी साळुंखे यांनी शेतक-यांनी नियमितपणे विद्यापीठ शास्‍त्रज्ञांच्‍या संपर्कात राहण्‍याचा सल्‍ला दिला. यावेळी पशुसंवर्धनावर डॉ बी एम ठोंबरे यांनी मार्गदर्शन केले तर रबी पिक लागवडीवर डॉ यु एन आळसे, किड व्‍यवस्‍थापनावर डॉ डी डी पटाईत यांनी तर रोग व्‍यवस्‍थापनावर डॉ एस व्‍ही पवार यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ एस एस शिंदे यांनी केले. सुत्रसंचालन विशाल राठोड यांनी केले तर डॉ ए एस जाधव यांनी आभार मानले. कार्यक्रमास गावातील शेतकरी बांधव मोठया संख्‍येने उपस्थित होते.