वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठातील कृषि महाविद्यालयाच्या वतीने राजमाता जिजाऊ मुलींने वसतीगृहात
दिनांक 15 ऑक्टोबर रोजी भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त
वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य
डॉ डि एन गोखले होते तर मुख्य वसतीगृह अधिक्षक डॉ आर पी कदम, शिक्षण विभागाचे
प्रभारी अधिकारी डॉ आर व्ही चव्हाण, डॉ जे व्ही एकाळे, डॉ एस पी झाडे आदींची
प्रमुख उपस्थिती होती.
प्राचार्य डॉ डि एन गोखले
आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की, माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल
कलाम यांनी देशाच्या अवकाश संशोधनात व सैन्य मिसाइल विकासात मोठे योगदान दिले. आजच्या
युवकांना प्रेरणादायी असे त्यांनी लिखान केले असुन विद्यार्थ्यांनी त्यांचे वाचन
करावे. वाचनामुळे विचारात प्रगल्भता येते. वाचनाने विज्ञान क्षेञातील विद्यार्थ्यांना
दर्जात्मक संशोधनास चालना मिळते.
वाचन प्रेरणा दिनानिमित्त
वसतीगृहात सामुदायिक वाचनाचा उपक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नेहा
काळे हिने केले तर आभार डॉ जे व्ही एकाळे यांनी मानले. कार्यक्रमास कृषि
महाविद्यालयातील विद्यार्थ्यींनी मोठया संख्येने उपस्थित होते.