Pages

Saturday, January 12, 2019

विविध फुलांनी बहरला वनामकृवितील उद्यानविद्या विभाग

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील उद्यानविद्या विभागातील प्रक्षेत्रावर शेवंती, ग्‍लेडियोलस, गुलाब, निशीगंध आदी फुलांच्‍या विविध जातींची लागवड करण्‍यात आली असुन सद्या हा परिसर फुलांनी बहरला आहे. यामुळे सदरिल सुभोभित प्रक्षेत्र बघण्‍यासाठी परिसरातील नागरीक व शैक्षणिक सहलीचे विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने येत आहेत. फुलझाडासह ब्रोकोली, कांदा, वांगी, डाळिंब आदी पिकांवरील प्रात्‍यक्षिके प्रक्षेत्रावर आहेत. पदवी व पदव्‍युत्‍तर अभ्‍यासक्रमाचा भाग व संशोधनाचे प्रयोग म्‍हणुन विद्यार्थ्यीच सदरिल भाजीपाला, फुलझाडे यांची लागवड करून निगा राखतात. अनुभव आधारी शिक्षण कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्‍यींच आंतरमशागत, काढणी, विक्री आदी कामे करतात.
सदरिल प्रक्षेत्रास विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. अशोक वण दिनांक 10 जानेवारी रोजी भेट दिला, यावेळी विद्यार्थ्यांचे कौतुक करून विद्यार्थ्यांना नौकरीच्या मागे न लागता कृषि उद्योजक होण्‍याचा सल्‍लाही त्‍यांनी दिला. याप्रसंगी शिक्षण संचालक डॉ. विलास पाटी, प्राचार्य डॉ. धर्मराज गोखले, विभाग प्रमुख डॉ. तुकाराम तांबे, डॉ एस एस यदलोड, डॉ एस जे शिंदे, डॉ व्हि एन शिंदे, डॉ ए एम भोसले, डॉ आर व्हि भालेराव, पी एम पवार, बी के शिंदे आदींसह विभागातील कर्मचारी व विद्यार्थ्‍यी उपस्थित होते.