मकरसंक्रातीचे औचित्य साधुन दिनांक 15 जानेवारी रोजी परभणी कृषि महाविद्यालयांतर्गत राजमाता जिजाऊ
पदव्युत्तर मुलींचे वसतिगृहामध्ये तिळगुळाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. कार्यक्रमास
सौ. उषाताई अशोक ढवण प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होत्या तर अन्नतंत्र व आहार, विभागाच्या प्रमुख डॉ. विजया नलावडे, डॉ. आशा विलास पाटील, सौ. उज्वला धर्मराज गोखले, डॉ. पपिता गौरखेडे आदींची प्रमुख उपस्थिती
होती. यावेळी सौ. उषाताई अशोक ढवण आपल्या
मार्गदर्शनात म्हणाल्या की, भारतीय संस्कृतीत विविध सणांचे महत्व आहे, समाजातील
व्यक्ती-व्यक्ती मधील संबंधात गोडवा नियमित राहण्याचा संदेश आपणास मकरसक्रांती सणापासुन मिळतो. हा
सण विविध राज्यात विविध प्रकारे हा सण साजरा केला जातो, असे त्यांनी सांगितले. डॉ आशा पाटील यांनी
मुलींना संतुलीत आहारा संबंधी मार्गदर्शन केले तर डॉ विजया नलावडे
यांनी नियमित व्यायाम व योगासनाचे महत्त्व पटवुन दिले. सौ उज्वला धर्मराज गोखले यांनीही आपले मनोगत व्यक्त
केले. तुळशीच्या रोपांचे वाण म्हणुन वाटप करण्यात
आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. स्वाती झाडे यांनी केले. सुत्रसंचालन श्रध्दा
एडके यांनी केले तर आभार आशा चव्हाण हीने मानले. सदरिल कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉ. डि. एन. गोखले आणि मुख्य
वसतिगृह अधिक्षक डॉ. आर. पी. कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.