मोजे उजळंबा येथील प्रगतीशील शेतकरी श्री.
राजाभाऊ
रगड यांना भारतीय कृषि अनुसंधान परिषद नवी दिल्ली अंतर्गत असलेल्या हैद्राबाद येथील केंद्रीय कोरडवाहू शेती संशोधन संस्था यांचे
वतीने उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. वसंतराव नाईक
मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत अखिल भारतीय समन्वयीत संशोधन प्रकल्पाच्या कोरडवाहू
शेती संशोधन केंद्राच्या वतीने
मौजे उजळंबा या गावात हवामान बदलानुरुप
राष्ट्रीय कृषि उपक्रम प्रकल्प मागील दोन वर्षापासून राबविण्यात येत आहे.
श्री.
राजाभाऊ
रगड यांनी हवामान बदलानुरुप
परिस्थितीत अनुकूल कोरडवाहू शेती तंत्रज्ञानाचा अवलंब त्यांच्या शेतावर करून शेतीत शाश्वत उत्पादन मिळविले. यात शेततळ्यात
पावसाचे पाणी साठवून त्याचा कार्यक्षम वापर पिकाचे उत्पादन वाढीसाठी करणे,
कोरडवाहू
फळपिके लागवड जसे पेरु,
सिताफळ
यांची लागवड, विद्यापीठ विकसित सोयाबीन पिकाचे सुधारित वाण लागवड,
आंतरपीक
पध्दती, रुंद वरंबा सरी पध्दतीने सोयाबीन लागवड
अशा विविध तंत्रज्ञानाचा अवलंब करून कोरडवाहू
शेतीत शाश्वत उत्पादन मिळविले, याबाबत त्याचा
पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
कोरडवाहु शेतीतील विविध
तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याबाबत कोरडवाहू शेती संशोधन केंद्राचे मुख्य
शास्त्रज्ञ डॉ. भगवान आसेवार व वरिष्ठ शास्त्रज्ञ
डॉ. मदन पेंडके यांनी वेळोवेळी त्यांना मार्गदर्शन केले. सदरिल पुरस्कार संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी मुख्य शास्त्रज्ञ
डॉ. भगवान आसेवार, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.
मदन
पेंडके, डॉ शिवाजी म्हेत्रे, डॉ अशोक जाधव
यांच्या
उपस्थितीत देण्यात आला.