वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्या सामुदायिक विज्ञान महाविद्यालयातील साधनसंपत्ती व्यवस्थापन आणि ग्राहक विज्ञान विभागाच्या
वतीने दिनांक 15
मार्च रोजी जागतिक ग्राहक हक्क दिन साजरा
करण्यात आला. यानिमित्त ग्राहक जागृतीच्या हेतुने ‘वस्तू व
सेवाकर’
या विषयावर परभणी येथील नामांकित सनदी
लेखापाल श्री अरविंद निर्मळ यांचे
व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. मार्गदर्शनात श्री अरविंद निर्मळ यांनी वस्तू व सेवाकरप्रणाली विषयी प्रत्येक ग्राहकांनी जागरुक
राहणे आवश्यक असल्याचे
सांगुन जीएसटी करप्रणाली बाबत सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ. हेमांगिनी सरंबेकर या होत्या.
प्रमुख व्यक्त्यांचा परिचय डॉ. जयश्री रोडगे यांनी करुन
दिला.
सुत्रसंचलन डॉ. माधुरी कुलकर्णी यांनी
केले तर आभार डॉ. जयश्री झेंड यांनी
मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व
विद्यार्थी मोठया संख्येने
उपस्थित होते.