लोकशाही अधिक भक्कम करण्यासाठी मतदानाचा
हक्क बजावा.....कुलगुरू मा डॉ अशोक ढवण
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि
विद्यापीठातील विद्यार्थ्यी कल्याण अधिकारी कार्यालयाच्या वतीने भारतरत्न डॉ
बाबासाहेब आंबेडकर यांची 128 वी जयंती दिनांक 14 एप्रिल रोजी उत्साहात साजरी करण्यात
आली. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांच्या
हस्ते पुजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ धर्मराज
गोखले, प्राचार्य डॉ उद्य खोडके, विद्यार्थ्यी कल्याण अधिकारी डॉ महेश देशमुख, विभाग
प्रमुख डॉ गजेंद्र लोंढे, डॉ डब्लु एन नारखेडे, विद्यार्थ्यी प्रतिनिधी राहुल
आरकडे, गुलाब इंगळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मार्गदर्शन करतांना कुलगुरू मा डॉ
अशोक ढवण म्हणाले की, डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी जगातील अनेक देशांच्या संविधानाचा
बारकाईने अभ्यास करून भारतीय परिस्थितीस अनूकुल अशी जगातील सर्वश्रेष्ठ संविधानाची
निर्मिती केली. ताठरता व ठिसुळता असे दोन्ही गुण या संविधानात आहेत. याच
संविधानाच्या आधारे जगातील सर्वात मोठया लोकशाही देशातील कारभार चालतो. आपल्या
देशाची लोकशाही अधिक भक्कम करण्यासाठी सर्वांनी मतदानाचा हक्क बजावला पाहिजे,
असा सल्लाही त्यांनी दिला. यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे
ढोलताशाच्या गजरात विद्यापीठ परिसरात मिरवणुक काढण्यात आली. कार्यक्रमाचे
सुत्रसंचालन प्रज्ञशिल वाघमारे यांनी केले तर आभार राहुल कन्हेरकर यांनी मानले.
कार्यक्रमास विद्यापीठातील अधिकारी, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यी मोठया
संख्येने उपस्थित होते.