Pages

Saturday, July 13, 2019

हरित विद्यापीठासाठी परभणीकरही सरसावले

माननीय कुलगुरू यांच्‍या वृक्षसंवर्धनाच्‍या आवाहनास मोठा प्रतिसाद
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ अशोक ढवण यांचा स्‍वच्‍छ परिसर, हरित परिसर व सुरक्षीत परिसर या संकल्‍पनेतुन हरित विद्यापीठासाठी विद्यापीठ परिसर व मराठवाडयातील विद्यापीठांर्गत असलेल्‍या प्रक्षेत्रावर यावर्षी एक लक्ष वृक्षलागवड व वृक्षसंवर्धन मोहिम दिनांक 1 जुलै रोजी हरित क्रांतीचे प्रणेते कै वसंतराव नाईक यांच्‍या जयंती पासुन हाती घेण्‍यात आली. आजपर्यंत मराठवाडयातील विद्यापीठ प्रक्षेत्रावर हजारो वृक्षांची लागवड करण्‍यात आली आहे. परंतु या वृक्षाचे जनावरे व मनुष्‍यापासुन संरक्षण करण्‍याची गरज लक्षात घेऊन संपुर्ण वृक्ष ट्री गार्डने संरक्षीत करण्‍याची आवश्‍यकता होती तसेच परिसरात येणा-या व्‍यक्‍तींमध्‍ये निर्सगप्रेम व वृक्षप्रेम वाढीस लागावे यासाठी माननीय कुलगुरू यांनी परिसरात येणा-यांच व्‍यक्‍तींनी वृक्षसंवर्धनाची जबाबदारी घेण्‍याचे आवाहन केले. या आवाहनास प्रतिसाद देऊन विद्यापीठ परिसरात सकाळ व संध्‍याकाळी मॉर्निग व इंव्‍हीनिंग वॉक साठी येणा-या प्रतिष्‍ठीत नागरिकांनी ट्रि-गॉर्ड खरेदीसाठी देगणीच्‍या स्‍वरूपात योगदान दिले. यात शहरातील प्रतिष्‍ठीत नागरिक, डॉक्‍टरांचा ग्रुप, विद्यापीठ सेवानिवृत्‍त कर्मचारी, विद्यापीठ कर्मचारी पतसंस्‍था आदींसह अनेकांनी वैयक्‍तीक देणगी स्‍वरूपात योगदान दिले. यापुर्वीही विद्यापीठ परीसरात फिरण्यासाठी येणार्या अनेकांनी अशी मोहीम विद्यापीठाने सुरु केल्यास स्वच्छेने आपले योगदान देण्याची इच्छा व्यक्त केली होती.
या मोहीमेस माननीय कुलगुरु डाॅ अशोक ढवण यांनी दहा हजार व डाॅ हिराकांत काळपांडे यांनी वीस हजार देऊन प्रारंभ करण्यात आला. या मोहिमेसाठी जमा झालेली रक्‍कम माननीय कुलगुरू डॉ अशोक ढवण यांना दिनांक 12 जुलै रोजी सपुर्त करण्‍यात आली.
यावेळी बोलतांना कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, प्रत्‍येक व्‍यक्‍तींनी जन्‍मदिनी, लग्‍नाच्‍या वाढदिवशी, आई-वडील, मुले-मुलींच्‍या नावे वृक्षलागवड करून वृक्षसंवर्धन करावे. झाडांमध्‍ये आपल्‍या भावना गुंतल्‍यास निश्चितच मानवाचे वृक्षप्रेम वाढीस लागुन वृक्षसंवर्धन होईल. विद्यापीठ परिसर सुंदर, स्‍वच्‍छ व सुरक्षित करण्‍याच्‍या दृष्‍टीने हरित परिसर हे एक पाऊल आहे, यात विद्यापीठातील विद्यार्थ्‍यी, प्रा़ध्‍यापक, अधिकारी, कर्मचारी आदीं योगदान देतच आहेत परंतु परभणी शहरातील प्रतिष्‍ठीत नागरिकही सहभागी होत आहेत, ही निश्चितच अभिमानाची बाब आहे, या सहभागामुळे माझे झाड, माझा परिसर, माझे विद्यापीठ ही भावना वाढीस लागण्यास मदत होणार असल्याचे मत व्‍यक्‍त केले.
यावेळी डॉक्‍टर ग्रुपचे डॉ सुभदा दिवाण, डॉ संध्‍या मानवतकर, डॉ प्रियंका मुळे, डॉ भारती आहुजा, डॉ स्मिता खोडके, सेवानिवृत कर्मचारी संघाचे श्री शिवाजीराव काकडे, विद्यापीठ पतसंस्‍थेचे प्रा राजाभाऊ बोराडे, डॉ राजेश कदम, डॉ प्रविण घाडगे, श्री कृष्‍णा जावळे, डाॅ टि बी भुक्तार, एकनाथ कदम, ए डी काळे, वैयक्‍तीकरित्‍या योगदान देणारे डॉ हिराकांत काळपांडे, डॉ विणा भालेराव, श्री कोकणे, डॉ जयकुमार देशमुख, डॉ रणजित चव्‍हाण, विराज एजन्‍सीचे विलास कौसडीकर आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ हिराकांत काळपांडे यांनी केले.