Pages

Thursday, August 1, 2019

मराठवाडयात कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव

कपाशीच्‍या पिकात कामगंध सापळे लावण्‍याचे वनामकृविच्‍या शास्‍त्रज्ञाचे आवाहन
डोम कळी

मराठवाडा विभागात कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळून येत असुन सद्या हवामान ढगाळ असल्याणे व कापसाला पाते, फुले लागत असल्याने गुलाबी बोंडअळीचे पतंग सक्रीय झालेले आढळून येत आहे. मादी पतंग पाते, फुले यावर अंडी घालतात, त्यामुळे कपाशीच्या पिकात कामगंध सापळे लावण्याची ही योग्य वेळ आहे. त्या अनुषंगाने वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विदयापीठाच्‍या किटकशास्त्र विभागाच्‍या वतीने गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन करण्यासाठी शेतकऱ्यांना पुढील प्रमाणे उपाय योजना करण्‍याचे आवाहन करण्यात येत आहे. 
सदयस्थितीत करावयाच्‍या उपाय योजना:
कपाशीच्या पिकात नियमित सर्वेक्षण करुन डोमकळ्या दिसून आल्यास त्या तोडून आतील अळीसह नष्ट करावे.
- गुलाबी बोंडअळीसाठीचे कामगंध सापळे हेक्‍टरी पाच प्रमाणे लावावीत, तसेच सापळयात सतत 2 ते 3 दिवस प्रति सापळा सरासरी 8 ते 10 पतंग आढळल्‍यास ही आर्थिक नुकसानीची पातळी समजावी.
- गुलाबी बोंडअळीचे पतंग कामगंध सापळयात अढळल्यास त्वरीत अझाडिरॅक्टीन 1500 पीपीएम 40 - 50 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
- उपलब्धते प्रमाणे कपाशीत एकरी 3 ट्रायकोकार्ड पानाच्या खालच्या बाजूस लावावेत.
फवारणीसाठी कीटकनाशके
कीडींचा प्रादुर्भाव
कीटकनाशके
प्रती दहा लिटर पाण्‍यात वापराचे प्रमाण
5 टक्के
अझाडिरॅक्टीन 0.15 टक्के
50 मिली
अझाडिरॅक्टीन 0.30 टक्के
40 मिली
क्विनॉलफॉस 25 ए एफ. किंवा
20 मिली
प्रोफेनोफॉस 50 ईसी किंवा
20 मिली
क्लोरोपायरीफॉस 20 ईसी
25 मिली
5-10 टक्के
थायोडीकार्ब 75 डब्ल्युपी किंवा
20 ग्रॅम
इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के एस जी
04 ग्रॅम
10 टक्के पेक्षा जास्त
थायामिथिक्झाम 12.6 टक्के + लॅमडा साहॅलोथ्रीन 9.5 टक्के झेड सी
04 मिली
प्रोफेनोफॉस 40 टक्के + सायपरमेथ्रीन 4 टक्के
20 मिली

वरील कीटकनाशकाचे प्रमाण हे साध्या पंपासाठी असुन पेट्रोल पंपासाठी हे प्रमाण तीनपट वापरावे. गुलाबी बोंडअळीमुळे होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी वेळीच जागरूक राऊन वरील प्रमाणे उपाययोजना कराव्यात असे वाहन किटकशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. पी.आर.झंवर, शास्‍त्रज्ञ डॉ. . जी. बडगुजर आणि डॉ. के. जी. अंभुरे यांनी केले आहे.
सध्या आढळून येत असलेली सुरुवातीच्या अवस्थेतील शेंदरी बोंडअळी