मराठवाडा विभागातील उशिरा पेरणी केलेल्या गव्हामध्ये तांबेरा रोगाचा
प्रादुर्भाव दिसून येत असुन या रोगाच्या व्यवस्थापनाकरिता प्रोपिकॉनाझोल 25% ईसी 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी
करावी. सदरिल प्रमाण साधा पंपासाठी असुन पॉवर स्पेअर करिता औषधाचे प्रमाण तीन पट
करावे, असा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी दिला
आहे. अधिक माहितीसाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषी तंत्रज्ञान
माहिती केंद्राशी संपर्क साधवा. दुरध्वनी क्रमांक ०२४५२-२२९०००