वसंतराव नाईक मराठवाडा कृषी
विद्यापीठातील कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्रातील शास्त्रज्ञ शेतक-यांच्या वेळोवेळी
शेतावर प्रत्यक्ष जाऊन तसेच केंद्रास शेतकरी भेटी दरम्यान कृषि सल्ला देतात.
परंतु कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू असल्यामुळे
शेतावर जाण्यासाठी मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे दिनांक 8
एप्रिल रोजी सकाळी 11 ते 12 यावेळेत
कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी झुम क्लाउड मिटिंग या मोबाईल अॅपव्दारे शेतक-यांशी संवाद साधण्यात आला. यासाठी कृषी विद्यावेत्ता
डॉ यु एन आळसे व डॉ शंकरी पुरी यांनी पुढाकार घेतला. यावेळी डॉ आनंद दौडे, डॉ डि डी पटाईत, डॉ प्रविण कापसे आदी शास्त्रज्ञ मोबाईल व्हिडिओच्या माध्यमातुन
सहभागी झाले होते. तर या व्हिडिओ बैठकीमध्ये मराठवाडयातील
परभणी, उस्मानाबाद, हिंगोली, बीड, वाशिम आदी जिल्हयातील 25 शेतकरी सहभागी झाले. विद्यापीठ शास्त्रज्ञांनी
संवाद साधत विविध पिकांची सद्याची परिस्थिती जाणुन घेऊन येत्या खरीप हंगामात कीड,
रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता पिकांचे फेरपालट करणे आवश्यक
असल्याचा सल्ला दिला. कापसावरील गुलाबी बोंडअळी व
मक्यावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव पुढील हंगामात होऊ नये याकरिता उन्हाळयात
करावयाची उपाय योजना, कोरोना रोगाच्या पार्श्वभुमीवर
शेतकरी बांधवानी शेतात काम करतांना घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन करण्यात
आले. शेतक-यांनी विचारलेल्या शंकाचे समाधान विद्यापीठ शास्त्रज्ञानी
केले.
या पुढील काळात शेतक-यांशी आठवडयातील एक किंवा दोन दिवस ऑनलाईन संवाद साधण्यावर भर दिला जाणार असुन येत्या सोमवारी दिनांक 13 रोजी सकाळी 11 ते 12 दरम्यान फळबाग व्यवस्थापन या विषयावर शेतक-यांशी ऑनलाईन संवाद साधला जाणार आहे, याकरिता ऑनलाईन बैठकीचा आयडी व पासवर्ड रविवारी पाठविण्यात येणार आहे, तरी शेतक-यांनी यात सहभागी होण्याचे आवाहन डॉ यु एन आळसे यांनी केले.