Pages

Monday, June 8, 2020

कृषिचे विद्यार्थी, प्राध्‍यापक व शास्‍त्रज्ञांशी साधणार पद्मश्री डॉ रमण गंगाखेडकर ऑनलाईन संवाद

वनामकृवित आयोजित कोरोना विषाणु प्रादुर्भाव व कृषि शिक्षणावरील परिणाम यावरील ऑनलाईन प्रशिक्षणाचे उदघाटन

पद्मश्री मा डॉ रमण गंगाखेडकर भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्‍या साथी व संसर्गजन्‍य रोग विभागाचे राष्‍ट्रीय प्रमुख आहेत.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील राष्‍ट्रीय कृषि उच्‍च शिक्षण प्रकल्‍प (नाहेप) च्‍या वतीने दिनांक 9 ते 13 जुन दरम्‍यान कोरोना विषाणु प्रादुर्भावाचा कृषि शिक्षणावर परिणाम यावरील ऑनलाईन प्रशिक्षणाचे आयोजन करण्‍यात आले असुन दिनांक 9 जुन रोजी सकाळी 10.00 वाजता प्रशिक्षण वर्गाच्‍या उदघाटन कार्यक्रमात भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे उपसंचालक पद्मश्री मा डॉ रमण गंगाखेडकर व नवी मुंबई येथील एमजीएम आरोग्‍य विज्ञान संस्‍थेचे कुलगुरू मा डॉ शंशाक दळवी हे प्रमुख पाहुणे म्‍हणुन सहभागी  होऊन मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण राहणार असुन शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले व सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्‍या प्राचार्या डॉ जयश्री झेंड यांची प्रमुख उप‍स्थिती राहणार आहे.

सदरिल प्रशिक्षणात कोरोना विषाणुच्‍या प्रादुर्भाव व कृषि शिक्षणावरील परिणाम यावर संबंधित  विविध विषयावर पुणे येथील दिनानाथ मंगेशकर हॉस्‍पीटलचे डॉ बालासाहेब पवार, आयआयडी मुंबईचे डॉ सतिश अग्नीहोत्री, राष्‍ट्रीय ग्रामीण आरोग्‍य मिशनचे डॉ लिना बडगुजर, परभणी येथील प्रसिध्‍द वैद्यकीय चिकित्‍सक डॉ रामेश्‍वर नाईक, पशुविज्ञान महाविद्यालयाचे डॉ आनंद देशपांडे, आहारतज्ञ डॉ आशा आर्या, मायक्रोबायोलॉजिस्ट डॉ किरण सागर, डॉ भारत पुरंदरे, डॉ सुजा कोशी, मनोचिकित्‍सक डॉ राजेंद्र बर्वे आदी मार्गदर्शन करणार आहेत. समारोपीय कार्यक्रमास नाहेप प्रकल्‍पाचे राष्‍ट्रीय समन्‍वयक डॉ प्रभात कुमार व जयपुर येथील सीसीएस राष्‍ट्रीय कृषि विपणन संस्‍थेचे संचालक डॉ चंद्रशेखर यांचा प्रमुख सहभाग राहणार आहेत.

सदरिल प्रशिक्षण वर्गात देशातील विविध विद्यापीठातील व संस्‍थेचे पदव्‍युत्‍तर विद्यार्थ्‍यी, प्राध्‍यापक व शास्‍त्रज्ञ सहभागी होणार असुन उदघाटन कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण विद्यापीठाच्‍या यूट्यूब चॅनेल https://www.youtube.com/user/VNMKV/ वर होणार आहे, अशी माहिती आयोजक डॉ गोपाल शिंदे, डॉ विना भालेराव, प्रा संजय पवार, डॉ मेघा जगताप यांनी दिली आहे.