Pages

Tuesday, July 7, 2020

मौजे सणपुरी येथे शेती औजरांचा वापर, निगा व सौर ड्रायर, सोलर ओव्हन आदीं बाबत प्रात्यक्षिके


महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा हरित क्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून दिनांक ०१ जुलै रोजी कृषी दिन साजरा करण्यात आला. यावर्षी दिनांक ०१ जुलै ते ०७ जुलै दरम्यान वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या वतीने कृषी विभागाच्या सहकार्याने संपुर्ण मराठवाडयातील आठही जिल्‍हयात कृषी संजीवनी सप्ताह अभियान कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्‍यात आला. विद्यापीठातील कृषि अभयांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्‍या कृषि यंत्र व शक्ति विभाग, आणि अपारंपारिक उर्जा विभाग यांच्‍या वतीने मौजे सणपूरी (जि. परभणी) येथे प्रगतशील शेतकरी श्री नरेश शिंदे यांच्या शेतावर विविध शेती औजरांचा वापर, निगा व देखभाल तसेच सौर ड्रायर, सोलर ओव्हन आदींबाबत प्रात्यक्षिकं व माहिती देण्यात आली. सदरील कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ उदय खोडके, विभाग प्रमुख डॉ स्मिता सोलंकी, डॉ राहुल रामटेके, प्रा पंडित मुंढे, डॉ गोपाल शिंदे, अन्‍नतंत्र महाविद्यालयाचे डॉ क्षीरसागर, कृषि उद्योजक श्री. कांबळे, कृषिभूषण श्री. ओंकार शिंदे आदीसह शेतकरी बांधव उपस्थिते होते.