Pages

Saturday, July 4, 2020

अर्धापुर तालुक्‍यातील मौजे मेंढल व लहान येथील शेतक-यांच्‍या बांधावर जाऊन विस्‍तार शिक्षण संचालक यांचे मार्गदर्शन

कृषि संजीवनी सप्‍ताहांतर्गत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ व कृषि विभाग, महाराष्‍ट्र शासन यांचे संयुक्‍त विद्यमाने दिनांक 2 जुलै रोजी अर्धापुर (जि नांदेड) तालुक्‍यातील मौजे मेंढल व मौजे लहान येथील शेतक-यांच्‍या बांधावर जाऊन विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर यांनी मार्गदर्शन केले, यावेळी उपविभागीय कृषि अधिकारी श्री सुखदेव यांची उपस्थिती होती. मार्गदर्शनात डॉ देवराव देवसरकर म्‍हणाले की, शेतकरी बांधवानी कीड व्‍यवस्‍थापनाकरिता कमी खर्चात घरीच 5 टक्के निंबोळी अर्क तयार करून फवारणी करावी. तसेच त्‍यांनी कपाशीतील कीड व खत व्‍यवस्‍थापन, सोयाबीन पिकातील तणनाशकाबाबत मार्गदर्शन केले. मौजे लहान येथे केळी काढणी, केळीचे विविध वाण व त्‍याकरिता लागणा-या खतांच्‍या मात्रा बाबत शेतक-यांना बांधावर जावुन मार्गदर्शन केले. यावेळी परिसरातील शेतकरी उपस्थित होते.