Pages

Wednesday, November 25, 2020

  सामुदायिक विज्ञान शाखेतून व्यवसायाभिमुख संधी यावर एक दिवसीय वेबिनार चे आयोजन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील सामुदायिक विज्ञान महाविद्यालय व नाहेप प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने सामुदायिक विज्ञान शाखेतून व्यवसायाभिमुख संधी यावर एक दिवसीय वेबिनार चे आयोजन दि. 26 नोव्हेंबर रोजी सकाळी दहा ते दुपारी एक या वेळेत करण्यात आले आहे.

या वेबिनारचा मुख्य उद्देश बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सामुदायिक विज्ञान शाखेतील विविधांगी संधी याविषयी माहिती मिळावी हा असून या विषयाबद्दल त्यांना सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या शाखेतील पदवी तथा पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर उपलब्ध नोकरी व व्यवसायाच्या संधी याबद्दल तज्ञ तसेच विविध क्षेत्रात कार्यरत, नावलौकिक मिळवलेले माजी विद्यार्थी त्यांच्या अनुभवातून मार्गदर्शन करणार आहेत. 

या वेबिनार चा लाभ अधिकाधिक विद्यार्थी, पालक व विविध क्षेत्रातील व्यावसायिक, शेतकरी तसेच शहरी व ग्रामीण भागातील जनतेने घ्यावा. संपूर्ण महाराष्ट्रातून केवळ मराठवाडा कृषी विद्यापीठ मध्ये ही एकमेव शाखा उपलब्ध असून आपल्या पाल्याचे या शास्त्रोक्त शिक्षणाद्वारे भविष्य उज्वल करावे असे आवाहन प्राचार्या डॉ जयश्री झेंड  यांनी केले आहे. 

या कार्यक्रमाचा लाभ झूम प्लॅटफॉर्म Meeting ID: 953 393 3363 Passcode: 12345, यूट्यूब तसेच फेसबुक पेज वर लाभ घेता येईल.