Pages

Thursday, February 25, 2021

वनामकृवितील नाहेप प्रकल्पाच्या माध्यमातुन शेतकरी बांधवाना उपयुक्त आधुनिक डिजिटल यंत्रे व औजारे निर्माण करण्‍यात यावीत ....... मा. आ. श्री. सतीश चव्हाण

वनामकृवितील नाहेप प्रकल्‍पांतर्गत सौर ऊर्जा प्रकल्प, कॅड कॅम प्रयोगशाळा, शीतगृह, शीतकरण व्हॅनचे उदघाटन

परभणी कृषी विद्यापीठातील नाहेप प्रकल्‍पांतर्गत आधुनिक प्रयोगशाळेची निर्मिती करण्‍यात येत असुन डिजिटल शेती तंत्रज्ञान विकसित करण्‍यात येत आहे. प्रकल्‍पातील कॅड कॅम व इतर प्रयोगशाळेचा वापर करुन शेतकरी बांधवाना उपयुक्‍त व कमी खर्चिक आधुनिक डिजिटल यंत्र व औजारे निर्माण करण्‍यात यावीत. प्रकल्‍पात कार्यन्‍वयीत करण्‍यात आलेला सौर ऊर्जा प्रकल्प, कॅड कॅम प्रयोगशाळा, शीतगृह, शीतकरण व्हॅन आदी उपक्रम निश्चितच कौतुकास्‍पद आहेत, असे प्रतिपादन विधानपरिषद सदस्य व उच्च शिक्षण व विकास आयोग सदस्य मा. आ. श्री. सतीश चव्हाण यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्प – नाहेप प्रकल्‍पांतर्गत २६ केव्ही सौर ऊर्जा प्रकल्प, कॅड कॅम  प्रयोगशाळा, शीतगृह, शीतकरण व्हॅन आदी अद्यावत उपक्रमाचे उदघाटन दिनांक २५ फेब्रुवारी रोजी मा. आ. श्री. सतीश चव्हाण आणि विधानसभा सदस्य मा. आ. डॉ. राहुल पाटील यांच्या हस्ते करण्‍यात आले, त्‍याप्रसंगी ते बोलत होते, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण हे होते तर विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य मा डॉ. अदितीताई सारडा, मा श्री. शरद हिवाळे, मा श्री. लिंबाजीराव भोसले, कुलसचिव श्री. रणजीत पाटील, शिक्षण संचालक डॉ. डी. एन. गोखले, संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. डी. बी. देवसरकर, विद्यापीठ नियंत्रक श्रीमती. दिपाराणी देवतराज, प्राचार्य डॉ. यु. एम. खोडके, विभाग प्रमुख डॉ. बी.व्ही. आसेवार, प्रा. डी.डी. टेकाळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी आमदार मा. डॉ राहुल पाटील म्‍हणाले की, परभणी कृषी विद्यापीठाने अनेक नाविन्यपूर्ण प्रकल्प उभारून एक चांगला पायंडा रचण्‍याचे काम केले आहे. नाहेप प्रकल्‍पाच्‍या माध्‍यमातुन डिजिटल शेती तंत्रज्ञानास चालना देण्याचे चांगले कार्य विद्यापीठात होत असुन हे तंत्रज्ञान मराठवाडयातील कृषि विकासासाठी फायदेशीर ठरेल अशी आशा व्यक्त केले. 

अध्यक्षीय मार्गदर्शनात डॉ. अशोक ढवण म्‍हणाले कीसंशोधक विद्यार्थी व शास्त्रज्ञांना नाहेप प्रकल्पातील विविध तंत्रज्ञान व प्रयोगशाळाचा संशोधनात लाभ होणार असुन येथील विकसित होणारे डिजिटल तंत्रज्ञान शेतक-यांना उपयुक्‍त ठरणार आहे.

मान्‍यवरांच्‍या हस्‍ते २६ केव्ही सौर ऊर्जा प्रकल्प, कॅड  कॅम  प्रयोगशाळा, शीतगृह, शीतकरण व्हॅन उदघाटन करण्‍यात आले. नाहेप प्रकल्‍पाचे अन्‍वेषक डॉ. गोपाळ शिंदे यांनी सौरचलित स्वयंचलित बहुउपयोगी फवारणी यंत्र, सौरचलित कापूस वेचणी यंत्र आदीसह प्रकल्‍पाबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ. मेघा जगताप यांनी केले.

यावेळी मल्टिस्पेक्ट्रल कॅमेरा, रिअल सेन्स कॅमेरा, लिडार कॅमेरा, स्पेक्ट्रोरेडिओमिटर आदींबाबत इंजि. अपुर्वा देशमुख यांनी माहिती दिली तसेच थ्री डी स्कॅनर याविषयी श्री. खेमचंद कापगते यांनी तर कॅड कॅम प्रयोगशाळेच्या कृषितील उपयोगाबद्दल श्री. रविकुमार कल्लोजी व शितगृहाबद्दल डॉ. हेमंत रोकडे यांनी माहिती दिली. 

कार्यक्रमाचे आयोजन शिक्षण संचालक डॉ. डी. एन. गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. गोपाळ शिंदे, डॉ. राजेश कदम, प्रा. संजय पवार यांनी केले. कार्यक्रम यशस्‍वीतेकरिता नाहेपचे इंजि. खेमचंद कापगते, डॉ. हेमंत रोकडे, डॉ. अनिकेत वाईकर, इंजि. रवीकुमार कल्लोजी, डॉ. अविनाश काकडे, श्री. रहिम खान, इंजि. स्वाती पाटील, इंजि. गोपाळ रनेर, इंजि. विश्वप्रताप जाधव, इंजि. तनझीम खान, इंजि. अपुर्वा देशमुख, श्री. प्रदिप मोकाशे, श्री. रामदास शिंपले, सौ. रेखा उदास, मुक्‍ता शिंदे, श्री. जगदीश माने, श्री. मारोती रनेर, श्री. गंगाधर जाधव आणि श्री. कुणाल कदम, श्री. रमेश कवाळे आदींनी परिश्रम घेतले.