Pages

Wednesday, March 17, 2021

सेंद्रीय शेतीमध्ये एकात्मिक जैविक कीड व्यवस्थापनावर भर देणे आवश्यक…..डॉ. एच. बी. सिंह, वाराणसी

नागपूर येथील क्षेत्रीय जैविक शेती केंद्रवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र आणि हैदराबाद येथील शाश्वत शेती केंद्र यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक 15 मार्च ते 21 मार्च दरम्यान सात दिवसीय ऑनलाईन सेंद्रीय शेती प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले असुन प्रशिक्षणाच्‍या तिस-या दिवशी दिनांक 17 मार्च रोजी बनारस हिंदु विश्वविद्यालय येथील माजी विभागप्रमुख तथा प्राध्यापक डॉ. एच. बी. सिंह, नागपूर येथील नीम फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री लक्ष्मीकांत पडोळे, किटकशास्‍त्रज्ञ डॉ. अनंत बडगुजर यांनी मार्गदर्शन केले तर कार्यक्रमाच्‍या अध्यक्षस्‍थानी डॉ. वाचस्पती पांडे हे होते. आयोजक डॉ. आनंद गोरे व डॉ. एन. के. भुते यांची उपस्थित होते.

बनारस हिंदु विश्वविद्यालय येथील माजी विभागप्रमुख डॉ. एच. बी. सिंह यांनी सेंद्रीय शेतीत जैविक किटकनाशकांचा वापर यावर मार्गदर्शन केले तर नागपूर येथील नीम फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री लक्ष्मीकांत पडोळे यांनी पीजीएस - इंडिया लोकल ग्रुपची स्थापना आणि स्थानिक गटांची नोंदणी, पीजीएस-भारत पोर्टलवर शेतक­यांची नोंद ऑनलाईन भरणे यावर मार्गदर्शन केले. तसेच डॉ. अनंत बडगुजर यांनी सेंद्रीय शेतीतील किटक व्यवस्थापन, एकात्मिक कीड व्यवस्थापन कार्यक्रमातंर्गत कामगंध सापळे, मित्रकीड,  मित्र पक्षी, परभक्षी किटक, जैविक किडनाशक, दशपर्णी अर्क, नीम अर्क, गोमुत्र आदींवर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा. ज्योती गायकवाड यांनी केले तर आभार प्रा. एस. बी. बोरगांवकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कु. चंद्रकला, कु. व्हिन्यासा, श्री. अभिजीत कदम, डॉ. सुनिल जावळे, श्री. श्रीधर पतंगे, श्री. सतिश कटारे, श्री. योगेश थोरवट आदींनी परिश्रम घेतले. सदरिल सात दिवसीय ऑनलाईन सेंद्रीय शेती प्रशिक्षण ग्रामीण भागातील युवक,  युवती,  पदवीधर, प्रगतशील शेतीकरी यांच्यासाठी कुलगुरु मा. डॉ. अशोक ढवण,  गाझीयाबाद येथील राष्ट्रीय जैविक शेती केंद्राचे संचालक डॉ. गगनेश शर्मा व संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 15 मार्च ते 21 मार्च दरम्यान आयोजन करण्यात आले आहे.