वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषी किटकशास्त्र विभागात शैक्षणिक वर्ष २०२० – २१ करिता परवानाधारक कृषी निविष्ठा विक्रेत्यांकरिता परवाना नुतनीकरणसंबंधी आवश्यक असलेला पीक संरक्षण व निविष्ठा व्यवस्थापन या एक वर्षीय पदविका अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया कृषी किटकशास्त्र विभाग, परभणी येथे राबविली जात असुन प्रवेश अर्जांचे प्रारूप व माहितीपुस्तिका विद्यापीठाच्या संकेतस्थळ http://www.vnmkv.ac.in वर दिनांक १ एप्रिल पासुन उपलब्ध करण्यात आले आहे. प्रवेश पात्रता दहावी उत्तीर्ण असुन अभ्यासकेंद्राची प्रवेश क्षमता ६० इतकी आहे. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख १५ एप्रिल असुन प्रवेशुच्छक उमेदवारांनी पुर्णपणे भरलेले अर्ज कागदपत्रांसह कृषी किटकशास्त्र विभागामध्ये कार्यालयीन वेळेत सादर करावे, असे आवाहन विद्यापीठाच्या वतीने करण्यात आले आहे.