विद्यापीठाच्या ४९ व्या वर्धापन
दिनानिमित्त
कार्यक्रमाचे आयोजन
परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विस्तार
शिक्षण संचालनालयाच्या वतीने दिनांक १८ मे रोजी विद्यापीठ वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी खरीप शेतकरी मेळाव्याचे आयोजन करून
साजरा करण्यात येतो. परंतु यावर्षी करोना रोगाचा प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर यावर्षीचा ऑनलाईन खरिप शेतकरी मेळाव्याचे आयोजन मंगळवार दिनांक १८ मे रोजी सकाळी
११.०० वाजता करण्यात आले आहे.
ऑनलाईन मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी
कुलगुरू मा डॉ अशोक ढवण हे राहणार असुन प्रमुख अतिथी तथा उदघाटक म्हणुन जालना येथील मराठवाडा शेती
सहाय्य मंडळाचे विश्वस्त तथा ज्येष्ठ कृषि तज्ञ मा श्री विजयअण्णा बोराडे हे सहभागी होणार आहेत तर पुणे येथील
कृषि तंत्रज्ञान उपयोजन संशोधन संस्थेचे संचालक मा डॉ लाखन सिंग यांची विशेष
अतिथी म्हणुन उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमास शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, संशोधन
संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर आदींचा सहभाग राहणार
आहे.
कार्यक्रमाचे आयोजन झुम मिटींग सॉफ्टवेअरच्या माध्यमातुन करण्यात येणार असुन शेतकरी बांधवानी झुम मिटींग सॉफ्टवेअर आपल्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करून मिटिंग आयडी ९५३ ३९३ ३३६१ वर पासवर्ड १२३४ टाकुन सहभाग नोंदवावा. सदरिल कार्यक्रमात विद्यापीठ शास्त्रज्ञ खरिप हंगामातील कापुस, सोयाबीन, तुर लागवड तंत्रज्ञान व इतर कृषि तंत्रज्ञानावर मार्गदर्शन करणार असुन सहभागी शेतक-यांच्या निवडक प्रश्नांना विद्यापीठ शास्त्रज्ञ उत्तर देणार आहेत. तरी सदरिल ऑनलाईन मेळाव्यास शेतकरी बांधवानी सहभागी व्हावे, असे आवाहन विस्तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ व्ही बी कांबळे व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री संतोष आळसे यांनी केले आहे. या संपुर्ण कार्यक्रमाचे प्रक्षेपण विद्यापीठाच्या युटयुब चॅनेल https://www.youtube.com/user/vnmkv वर उपलब्ध होणार आहे.
Zoom Meeting ID: ९५३ ३९३ ३३६१ Password: १२३४