महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल तथा विद्यापीठाचे
कुलपती मा श्री भगत सिंह कोश्यारी यांचा दिनांक 7 ऑगस्ट रोजी वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठाच्या भेटी दरम्यान विद्यापीठातील विविध प्रकल्पास भेट देऊन कृषि
महाविद्यालयाच्या सभागृहात विद्यापीठाच्या कार्याचा आढावा घेणार आहेत.
संपुर्ण कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती
कुलगुरू मा डॉ अशोक ढवण व जिल्हाधिकारी मा श्रीमती आंचल गोयल यांची विशेष उपस्थिती. पोलीस अधिक्षक मा श्री जयंत मीना, शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, कुलसचिव डॉ धीरजकुमार कदम आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
बांबु संशोधन प्रक्षेत्रास भेट : मराठवाडयातील 85 टक्के भाग हा कोरडवाहु शेतीचा आहे, बहुसंख्येने शेतकरी हे लहान व अल्पभुधारक असुन बदलत्या हवामान परिस्थितीत शाश्वत उत्पादनाकरिता एकात्मिक शेती पध्दतीचा अवलंब करणे गरजेचे आहे. या एकात्मिक शेती पध्दतीत बांधावर बांबु लागवड हा लहान व अल्प भुधारक शेतक-यांकरिता फायदेशीर होऊ शकते हा दृष्टीकोन समोर ठेऊन विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वयीत कोरडवाहु शेती संशोधन प्रकल्प अंतर्गत बांबु संशोधन प्रक्षेत्रावर चार प्रकारच्या बाबुच्या जातीचे लागवड विविध अंतरावर करण्यात आली आहे. मराठवाडा विभागाच्या परिस्थितीत कोणती बांबुची जात जास्त व शाश्वत उत्पादन देईल व त्याकरिता लागणारे लागवड तंत्रज्ञान यांचे संशोधनात्मक प्रात्यक्षिक घेण्यात आले आहे. यात ईशान्य भारतात आढळणा-या मानवेल, कटांग, मानगा निवडक चार जातीचा समावेश आहे.
माहिती देणार – संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर, डॉ डब्ल्यु एन नारखेडे, डॉ मदन पेंडके आदी.
जागतिक बॅक पुरस्कृत नाहेप प्रकल्पास भेट : जागतिक बॅक व भारतीय कृषि संशोधन परिषद पुरस्कृत प्रगत कृषि विज्ञान व तंत्रज्ञान केंद्र राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्पांतर्गत 'कृषि उत्पादकता वाढीकरिता यंत्रमानव, ड्रोन व स्वयंचलित यंत्राव्दारे डिजिटल शेती' यावरील सेंटर ऑफ एक्सेलन्स प्रशिक्षण प्रकल्पास भेट देणार आहेत. यावेळी त्याच्या हस्ते प्रकल्पात विकसित करण्यात आलेल्या कृषि यंत्रमानव, ड्रोन व स्वयंचलित कृषि यंत्रे प्रयोगशाळेचे उदघाटन करण्यात येणार असुन नाहेप प्रकल्प निर्मित ऑफिस अॅडमिनिस्ट्रेशन सॉफ्टवेअर, कृषि हवामान सल्ला अॅप आदीसह विविध मोबाईल अॅप्स व विविध प्रकाशनाचे विमोचन करण्यात येणार आहे.
माहिती देणार – शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, प्रकल्प प्रमुख डॉ गोपाल शिंदे आदी
अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयास भेट : अन्नतंत्र महाविद्यालयातील फळे व भाजीपाल प्रक्रिया प्रकल्पास भेट देणार असुन महाविद्यालयातील यशस्वी माजी विद्यार्थी, अन्न प्रक्रिया उद्योजक व जिल्हयातील अन्न प्रक्रिया उद्योजक निर्मित उत्पादन दालनास भेट देणार आहेत. येथे महािवद्यालयातील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी अनुभव आधारित शिक्षण कार्याक्रमांतर्गत तयार केलेल्या फळे व भाजीपाला पासुन उत्पादीत केलेल्या स्क्वॅश, केचप, सॉस आदी पदार्थ दालनास भेट देणार आहेत. यावेळी कृषि प्रक्रिया उद्योजकांशी महामहिम राज्यपाल संवाद साधणार आहेत.
माहिती देणार – प्राचार्य डॉ उदय खोडके व इतर
जिजाऊ पदव्युत्तर मुलींचे वसतीगृह : विद्यापीठांतर्गत असलेले जिजाऊ पदव्युत्तर मुलींचे वसतीगृहात राहत
असलेल्या विविध राज्यातुन प्रवेश घेतलेल्या पदव्युत्तर विद्यार्थींनीशी संवाद
साधणार
माहिती देणार – शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, मुख्य वसतीगृह अधिक्षक डॉ राजेश कदम
विद्यापीठ ग्रंथालय : विद्यापीठ ग्रंथालयातील डिजिटल व अद्ययावत ग्रंथालय सुविधा व मा राष्ट्रपती डॉ एपीजी अब्दुल कलाम प्रेरणा केंद्र यास भेट देणार आहेत.
माहिती देणार – विद्यापीठ ग्रंथपाल डॉ संतोष कदम
महामहिम राज्यपाल यांच्या हस्ते वृक्षारोपण : हरित विद्यापीठ उपक्रमांतर्गत कृषि महाविद्यालय
परीसरातील वसंतराव नाईक उद्यानात महामहिम राज्यपाल यांच्या हस्ते वडाचे झाड
लावुन वृक्षारोपण करण्यात येणार आहे.
माहिती देणार – प्राचार्य डॉ सय्यद ईस्माईल, डॉ हिराकांत काळपांडे, डॉ महेश देशमुख आदी
सभागृहात आढावा बैठक व विद्यापीठ शास्त्रज्ञ व
प्राध्यापकांशी संवाद
कृषि महाविद्यालयाच्या सभागृहात महामहिम राज्यपाल यांच्या समोर विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ अशोक ढवण विद्यापीठाच्या कृषि शिक्षण, कृषि संशोधन व विस्तार शिक्षण कार्याचा आढावा सादर करणार आहेत. तसेच विद्यापीठाने राबविलेल्या स्वच्छ भारत अभियान व हरित विद्यापीठ उपक्रमाबाबतची चित्रफित सादर करण्यात येणार आहे. माननीय राज्यपाल महोदय उपस्थितांना संबोधित करणार आहेत.
स्थळ - सभागृह, कृषि महाविदयालय, परभणी, दिनांक 7.8.2021 शनिवार, वेळ - सकाळी 10.28 ते 12.00