Pages

Thursday, September 16, 2021

महिला सक्षमीकरणावर ऑनलाईन कार्यशाळा संपन्‍न

विद्यापीठ सुवर्ण महोत्सवी वर्ष स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत अखिल भारतीय समन्वयीत संशोधन प्रकल्प गृहविज्ञान पाटोदा (जि बीड) येथील वसंतदादा पाटील कला, वाणिज्य विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १५ सप्‍टेंबर रोजी सावित्रीबाई फुले महिला सक्षमीकरण तक्रार कक्षामार्फत महिला सक्षमीकरण यावर एकदिवसीय ऑनलाईन कार्यशाळेच्या आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ बळीराम राख हे होते तर प्रमुख वक्त्या वरिष्ठ शास्त्रज्ञ (मानव विकास) प्रा. निता गायकवाड, उपप्राचार्य डॉ. किशोर मचाले, पदव्यूत्तर विभाग संचालक डॉ. मनोजकुमार प्रकाश, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा. नंदकुमार पटाईत, पर्यवेक्षक प्रा. रमेश टाकणखार आदींचा सहभाग होता.   

मार्गदर्शनात प्रमुख वक्त्या वरिष्ठ शास्त्रज्ञ (मानव विकास) प्रा. निता गायकवाड यांनी महिला सक्षम होणे ही आज काळाची गरज असुन आधुनिक काळात महिला सक्षमीकरणाचे पैलू गतकाळापेक्षा वेगळे आहेत. आज सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आदि क्षेत्रांमध्ये महिलांना त्यांचा अधिकार भुमिका बजावण्याची संधी दिली गेली पाहिजे. महिलांच्या संरक्षणार्थ  असलेल्या विविध कायदे, भारतीय राज्‍यटनेने भारतीय दंड संहितेचे संदर्भ देऊन सविस्तर माहिती दिली. केंद्र शासनाच्या पुरस्‍कृत महिलांसाठी असलेल्या राष्ट्रीय आहार मिशन, पंतप्रधान उज्वला योजना, तिहेरी तलाक कायदा याचीही माहिती सांगितली. सुत्रसंचालन डॉ. ज्योती क्षीरसागर यांनी केले तर आभार डॉ. अनिता धारासूरकर यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक कर्मचारी यांनी सहभाग नोंदविला.