Pages

Thursday, November 11, 2021

वनामकृविच्‍या लातुर येथील कृषि महाविद्यालयात राष्‍ट्रीय परिसंवादाचे आयोजन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे सुवर्ण महोत्‍सवी वर्ष, नवी दिल्‍ली येथील भारतीय वनस्‍पती रोगशास्‍त्र संस्‍थेचे अमृत महोत्‍सवी वर्ष आाणि भारतीय स्‍वातंत्रयाच्‍या अमृत महोत्‍सवी वर्षचे औचित्‍य साधुन दिनांक 17 व 18 नोव्‍हेंबर रोजी शाश्‍वत पिक उत्‍पादनाकरिता अन्‍नद्रव्‍य व्‍यवस्‍थापन आणि पिक सरंक्षण यावर दोन दिवसीय राष्‍ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्‍यात आले असुन परिसंवादाचे उदघाटन दिनांक 17 नोव्‍हेंबर रोजी सकाळी 10.00 वाजता लातुर कृषि महाविद्यालयाच्‍या मुख्‍य सभागृहात होणार आहे. उदघाटन कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्‍हणुन भारत सरकारचे माजी कृषी आयुक्‍त तथा माजी कुलगुरू मा डॉ चारूदत्‍त मायी हे उपस्थित राहणार असुन कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण हे राहणार आहेत. कार्यक्रमास दापोली येथील डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ संजय सावंत, कुषिभुषण मा श्री बी बी ठोंबरे, शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, नवी दिल्‍ली येथील भारतीय पीक रोगशास्‍त्र संस्‍थेचे अध्‍यक्ष डॉ प्रतिभा शर्मा, सचिव डॉ रोबिन गोगोई आदींची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. स‍दरिल परिसंवादात देशातील विविध राज्‍यातील कृषि शास्‍त्रज्ञ, अभ्‍यासक, प्राध्‍यापक, कृषि उद्योजक, विद्यार्थी, प्रगतशील शेतकरी सहभागी होऊन पीक संरक्षणावर मंथन करणार असुन परिसंवादाकरिता 350 पेक्षा जास्‍त संशोधनपर लेख प्राप्‍त झाले आहेत. परिसंवादाचे आयोजन सचिव लातुर कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अंगद सुर्ववंशी, सहसचिव डॉ चंद्रशेखर अंबडकर, स्‍थानिक आयोजन समितीचे सचिव डॉ आनदं कारले हे असुन परिसंवादाचे आयोजन लातुर कृषि महाविद्यालय, कै विलासराव देशमुख कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, कृषि तंत्र विद्यालय, गळीत धान्‍य संशोधन केंद्र येथील प्राध्‍यापक, अधिकारी व कर्मचारी यांच्‍या सहकार्याने करण्‍यात आले आहे.