Pages

Sunday, December 26, 2021

वनामकृवित आयोजित उती आणि पाने सुक्ष्म मुलद्रव्य तपासणी यावरील कृषि तंत्रज्ञ अधिका­यांचे प्रशिक्षण संपन्न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील मृद विज्ञान व कृषि रसायशास्त्र विभाग आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने उती व पाने सुक्ष्म अन्नद्रव्ये तपासणी या विषयावरील पाच दिवशीय प्रशिक्षण दिनांक २० ते २४ डिसेंबर दरम्यान आयोजन करण्यात आले होते, प्रशिक्षणाचे उदघाटन दिनांक २० डिसेंबर रोजी परभणी कृषि महाविद्यालाचे प्राचार्य डॉ. सय्यद इस्माईल यांच्‍या हस्‍ते झाले तर प्रमुख पाहुणे गोळेगांव कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भगवान आसेवार हे होते. 

पाच दिवशीय प्रशिक्षणात आयोजक विभाग प्रमुख डॉ. प्रविण वैद्य यांनी उती व पर्ण परीक्षणाचे महत्व सांगुन विविध उपकरणांबाबत मार्गदर्शन केले तर पर्ण नमुना घेणे, प्रक्रीया करणे, त्यातील नत्र, स्फुरद, पालाश, गंधक, सुक्ष्म अन्नद्रव्य आदीबाबत प्रात्याक्षीकासह मार्गदर्शन डॉ. एस.एल. वाईकर, डॉ. बी.आर. गजभीये, डॉ. स्वाती झाडे, डॉ. ए.एल. धमक, डॉ. पपीता गौरखेडे यांनी केले. कृषि विभागाच्या प्रयोगशाळेतील तंत्र अधिकारी यांना प्रयोगशाळेत “उती आणि पाने सुक्ष्म मुलद्रव्य” तपासणी तंत्रज्ञान प्रशिक्षणव्दारे शिकवले गेले.  

प्रशिक्षणाचा समारोपीय कार्यक्रम दिनांक २४ डिसेंबर रोजी प्राचार्य डॉ. सय्यद इस्माईल यांच्‍या अध्‍यक्षतेखाली संपन्‍न झाला, यावेळी विभाग प्रमुख डॉ प्रविण वैद्य, जिल्हा मृद चाचणी अधिकारी श्री घुले, डॉ सुरेश वाईकर हे व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी प्रशिक्षनार्थी श्री भोगे, श्री राऊत, श्रीमती आशालता भोसले आदींनी प्रशिक्षणाचा अनुभव मनोगतात व्यक्त केले. प्रशिक्षनार्थीना मान्‍यवरांच्या हस्ते प्रशिक्षण प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. सुत्रसंचलन प्रशिक्षण समन्वयक डॉ. स्वाती झाडे यांनी केले. प्रशिक्षणासाठी मराठवाड-यातील चार जिल्हयातील सव्वीस तंत्र अधिकारी आणि तंत्रज्ञ कृषि सहाय्यक यांनी सहभाग नोंदविला होता.

स‍दरिल प्रशिक्षणाचे मुख्‍य आयोजक विभाग प्रमुख डॉ प्रविण वैद्य हे होते तर प्रशिक्षण समन्‍वयक डॉ स्‍वाती झाडे या होत्‍या. प्रशिक्षण यशस्वीतेसाठी डॉ. रामप्रसाद खंदारे, डॉ. महेश देशमुख, डॉ. संतोष चिक्षे, डॉ स्नेहल शिलेवंत, श्री भानुदास इंगोले, श्री अभिजीत पतंगे, श्री अजय चरकपल्ली, श्री अक्षय इंगोले, राकेश बगमारे, निखील पाटील, शुभम गीरडेकर, प्रीयंका लोखंडे, प्रीया सत्वधर,श्री शिरीष गोरे, आंनद नंदनवरे, चेतन जोंधळे व इतर कर्मचारी यांनी सहकार्य केले. कार्यक्रमास विभागातील प्राध्यापक व पदव्युत्तर विद्यार्थी यांची उपस्थिती होती.