Pages

Tuesday, February 15, 2022

वनामकृवितील संकरीत गो पैदास प्रकल्पाच्‍या वतीने जातीवंत देवणी व होलदेव जनावरांचा जाहीर लिलाव

परभणी: वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत संकरीत गो पैदास प्रकल्प (बलसा डेअरी) येथे संकरीत देवणी आणि होलदेव जातीच्या संकरीत जनावरांचा (गाय, कालवडी, गो-हे व वळू) जाहीर लिलाव व विक्रीचे आयोजन बुधवार दिनांक 16 फेबुवारी रोजी सकाळी 11.00 वाजता करण्‍यात आले आहे.

संकरीत गो-पैदास प्रकल्पाची स्थापना सन 1975 साली झालेली असुन मराठवाडा विभागासाठी जातीवंत देवणी व होलदेव जनावरांचे मोठया प्रमाणावर निर्मिती करून संवर्धन व संगोपन केल्या जाते. देवणी ही महाराष्ट्रातील एकमेव बहुउद्देशीय जात असुन उत्तम व्यवस्थापनाव्दारे 5 ते 6 लिटर दुध देण्याची क्षमता आहे. प्रकल्पावर शेतकरी व गोपालक मोठया प्रमाणात भेटी देण्यासाठी येत असतात. मराठवाडयासह संपूर्ण महाराष्ट्रातील शेतक­यांना व गोपालकांना जातीवंत पशुधनांचे महत्व समजावे, तसेच यापासुन त्‍यांच्‍या शेती व्‍यवसायात आर्थिक स्‍थैर्य मिळावे या हेतूने दरवर्षी प्रकल्पाव्दारे जातीवंत पशुधनांचा जाहीर लिलाव व विक्री आयोजित करण्यात येते. तरी महाराष्ट्रातील शेतकरी व गोपालक यांनी दि. 16 फेब्रुवारी रोजी होणा­या जाहीर लिलावामध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभाग घ्यावा असे आवाहन संकरीत गो पैदास प्रकल्पाचे जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ. डी. एस. चौहाण, वनामकृवि., परभणी यांनी केले आहे.