Pages

Wednesday, March 16, 2022

कृषि संशोधनात डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्‍याची गरज ...... कुलगुरू मा डॉ अशोक ढवण

वनामकृवित आयोजित प्रगत डिजिटल तंत्रज्ञानावरील आंतरराष्‍ट्रीय कार्यशाळेचा समारोप

डिजिटल तंत्रज्ञानाने मानवाचे जीवन व्‍यापले असुन शेती क्षेत्रातही डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढणार आहे. भविष्‍याचा वेध घेऊन डिजिटल शेती करिता लागणारे मनुष्‍यबळ निर्मितीवर परभणी कृषि विद्यापीठ भर देत असुन नाहेप प्रकल्‍पाच्‍या माध्‍यमातुन विविध प्रशिक्षण कार्यक्रम, कार्यशाळा आदीचे आयोजन करण्‍यात येत आहे. हे डिजिटल तंत्रज्ञान कौशल्‍य व ज्ञान कृषिचे विद्यार्थी व विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी अवगत करून कृषि संशोधनात याचा समावेश करण्‍याचे आवाहन अध्यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील नवी दिल्‍ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषद पुरस्‍कृत राष्‍ट्रीय कृषि उच्‍च शिक्षण प्रकल्‍प (नाहेपच्‍या वतीने दिनांक १४ ते १६ मार्च दरम्‍यान शेती स्‍वयंचलनातील प्रगत डिजिटल तंत्रज्ञान यावर आंतरराष्‍ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्‍यात होते, सदरिल कार्यशाळेच्‍या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्‍हणुन अकोला येथील डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे माजी कुलगुरू मा डॉ व्‍ही एम मायंदे आणि अहमदाबाद येथील इस्‍त्रो - अंतराळ उपयोग केंद्राचे अंतराळ शास्‍त्रज्ञ मा डॉ बिमल कुमार भट्टाचार्य यांची ऑनलाईन पध्‍दतीने उपस्थिती होती. तर व्‍यासपीठावर आयआयडी खरगपुर येथील शास्‍त्रज्ञ डॉ अलोक कांती देब, प्राचार्य डॉ उदय खोडके, कुलसचिव डॉ धीरजकुमार कदम, नाहेप प्रकल्‍प मुख्‍य अन्‍वेषक डॉ गोपाल शिंदे, आयोजन सचिव डॉ कैलास डाखारे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मार्गदर्शनात मा डॉ व्‍ही एम मायंदे म्‍हणाले की, विदेशात कृत्रिम बुध्‍दीमत्‍ता, ब्‍लॉकचेन तंत्रज्ञान, इंटरनेट ऑफ थिंग्‍ज आदी डिजिटल तंत्रज्ञानाचा मोठया प्रमाणात वापर होत आहे, भारतासारख्‍या शेतात अल्‍पभुधारक शेतक-यांची संख्‍या जास्‍त आहे, त्‍यांना किफायतीशीर डिजिटल तंत्रज्ञान विकसित करावे लागेल. यासाठी परभणी कृषि विद्यापीठाने नाहेप प्रकल्‍पाच्‍या माध्‍यमातुन पुढाकार घेतला आहे. मराठवाडयात मुख्‍य पिक उत्‍पादकतेता स्थिरता आली असुन भविष्‍यात डिजिटल तंत्रज्ञानाच्‍या आधारेच ही उत्‍पादकता वाढीस मदत होईल. डिजिटल तंत्रज्ञानाने कमीतकमी शेती निविष्ठांचा कार्यक्षम वापर करून पिक उत्‍पादनात शाश्‍वत वाढ करणे शक्‍य होईल, अशी आशा त्‍यांनी व्‍यक्‍त केली.

भाषणात मा डॉ बिमल कुमार भट्टाचार्य यांनी डिजिटल शेतीत डाटा विज्ञानाचे महत्‍व असुन कृषि शास्‍त्रज्ञांनी त्‍यावर काम करण्‍याची गरज असल्‍याचे म्‍हणाले तर डॉ अलोक कांती देब यांनी पदव्‍युत्‍तर विद्यार्थ्‍यांनी कार्यशाळेत प्राप्‍त केलेल्‍या डिजिटल तंत्रज्ञान बाबतच्‍या कौशल्‍य व ज्ञानाचा उपयोग पदव्‍युत्‍तर संशोधनात करण्‍याचे आवाहन केले. कार्यक्रमात सहभागी विद्यार्थी, शास्‍त्रज्ञ व प्राध्‍यापकांना मान्‍यवरांच्‍या हस्‍ते प्रमाणपत्र वितरित करण्‍यात आले. कार्यक्रमात आयोजन सचिव डॉ कैलास डाखोरे यांनी कार्यशाळेचा कार्यवृत्‍तांत मांडला तर प्रकल्‍प मुख्‍य अन्‍वेषक डॉ गोपाल शिंदे यांनी प्रास्‍ताविक केले. सुत्रसंचालक डॉ विणा भालेराव यांनी केले.

सदरिल तीन दिवसीय कार्यशाळेत शेतीचे स्‍वयंचलिकरणकृषि यंत्रमानव, कृषि ड्रोनशेतीत इटरनेट ऑफ थिंग्‍सचा वापरकृत्रिम बुध्‍दीमत्‍ता, माहिती तंत्रज्ञानाचा शेतीतील उपयोगअन्‍न प्रक्रियेतील स्‍वयंचलिकरणस्‍वयंचलित शेतीयंत्र आदी विषयावर  अमेरिकाफिलिपाईन्‍स तसेच देशातील नामांकित संस्‍थेतील शास्‍त्रज्ञांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेत विद्यापीठातील प्राध्‍यापकशास्‍त्रज्ञ व विद्यार्थी कार्यशाळेत सहभागी झाले होते. कार्यशाळेचे मुख्‍य आयोजक प्रकल्‍पाचे मुख्‍य अन्‍वेषक डॉ गोपाल शिंदेआयोजन सचिव डॉ  कैलास डाखोरे असुनकार्यशाळेचे समन्‍वयक प्राचार्य डॉ यु एम खोडकेडॉ आर पी कदमइंनि. एस एन पवारडॉ एस आर गरूड आदी होते. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी विद्यापीठातील आणि नाहेप प्रकल्‍पातील अधिकारी, शास्‍त्रज्ञ आणि कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.