Pages

Friday, March 4, 2022

तिस-या राज्‍यस्‍तरीय कर्मचारी क्रीडा स्‍पर्धेत वनामकृविच्‍या संघाचे घवघवीत यश

दापोली (जिल्हा रत्नागिरी) येथील डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठात राज्‍यातील चारही कृषि विद्यापीठे, महाराष्‍ट्र पशु आणि मत्‍स्‍य विज्ञान विद्यापीठ, नागपुर महाबीज यांच्‍या तिस-या राज्‍यस्‍तरिय कर्मचारी क्रीडा स्‍पर्धेचे दिनांक १ ते ३ मार्च दरम्‍यान आयोजन करण्‍यात आले होते. या क्रीडा स्पर्धेत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या संघाने विविध क्रीडा स्‍पर्धेत आपला दबदबा कायम राखत घवघवीत यश मिळविले. विद्यापीठाच्‍या संघाने व्हॉलीबॉल, बॉस्केटबॉल आणि बॅडमिंटन स्‍पर्धेत सुवर्ण पदक पटकाविले तर क्रिकेट, रस्‍सीखेच, बुध्दिबळ स्‍पर्धेत रौप्‍य पदक पटकाविले तसेच वैयक्तिक स्पर्धेत दोन कांस्‍य पदक पटकाविले. बक्षीस वितरण समारंभात डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ कुलगुरू मा. डॉ संजय सावंत यांच्‍या हस्‍ते विजेत्‍या संघास पोरितोषिके प्रदान करण्‍यात आले, यावेळी शिक्षण संचालक डॉ. एस एस नारखेडे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. एस जी भावे आदींची प्रमुख उपस्थिती होती. परभणी विद्यापीठाच्‍या यशाबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ अशोक ढवण, शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले आदींनी अभिनंदन केले.

छायाचित्र :  व्‍हॉलीबॉल स्‍पर्धेतील सुवर्ण पदक स्‍वीकारातांना विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. महेश देशमुख, संघाचे कर्णधार श्री अशोक खिल्लारी, उपकर्णधार डॉ.सचिन मोरे आदी.