Pages

Sunday, April 10, 2022

राष्ट्रीय छात्र सैनिकांनी केली पिंगळी येथील पिंगलेश्वर ऐतिहासिक बारवेची स्वच्छता

श्री शिवाजी महाविद्यालय आणि कृषि महाविद्यालयच्‍या राष्‍ट्रीय छात्रसैनिकांचा संयुक्‍त उपक्रम

देशाचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेला अनुसरून जलस्रोत स्वच्छ करण्यासाठी आणि कचरामुक्त करण्यासाठी 'पुनीत सागर अभियान' ही देशव्यापी मोहीम सुरू करण्‍यात आली आहे. या 'पुनित सागर अभियान' अंतर्गत, ५२ महाराष्ट्र बटालियन एन. सी. सी., नांदेड अंतर्गत असलेल्‍या श्री शिवाजी महाविद्यालय आणि वसंतराव नाईक मराठावाडा कृषी विद्यापीठातील परभणी कृषी महाविद्यालय येथील राष्‍ट्रीय छात्र सेनाच्‍या छात्रसैनिकांनी दिनांक ८ एप्रिल रोजी पिंगळी येथील पिंगळेश्‍वर ऐतिहासिक बारवेची स्‍वच्‍छता केली. बारव मध्‍ये मोठया प्रमाणात कचरा जमा झाला होता. मोहिमेच्या यशस्वीतेसाठी लेफ्टनंट डॉ जयकुमार देशमुख, लेफ्टनंट डॉ प्रशांत सराफ, डॉ. संतोष कोकीळ, डॉ. प्रल्हाद भोपे आदींसह आशिष सोनवणे, अमर गायकवाड, चंद्रकांत सातपुते, धनराज ठाकूर, वैभव चाटेकर, सौरभ छात्रसैनिकांनी पुढाकार घेतला. सदरील मोहिमेकरिता कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सय्यद इस्माईल आणि श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव यांनी  प्रोत्साहीत करुन कार्याचे कौतुक केले.