Pages

Wednesday, June 15, 2022

वनामकृवितील कृषी अभियांत्रिकी व अन्नतंत्र महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी रेल्वेस्थानक परिसरात राबविली स्वच्छता मोहिम

माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत उपक्रम

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय व अन्नतंत्र महाविद्यालयाच्‍या राष्ट्रीय सेवा योजनाच्‍या वतीने माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत पर्यावरण जनजागृती व स्वच्छता विषयक विविध उपक्रम राबविण्‍यात आले. यात दिनांक १३ जुन रोजी राष्ट्रीय योजनेच्या स्वयंसेवकांनी विद्यापीठ प्रवेशव्‍दार परिसरात जलसिंचन, वृक्षारोपण व व्यसनमुक्ती संदर्भातील पथनाट्ये सादर केली. शहरातील रेल्वे स्थानक परिसरात स्वयंसेवकांनी स्वच्छता मोहिम राबवुन प्लास्टिक सारख्या अविघटनशील व विघटनशील कचरा जमा करून त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली. त्याच प्रमाणे रेल्‍वेस्थानकाच्या समोरील भागात वृक्षारोपण करण्यात आले.

कार्यक्रम यशस्वितेकरिता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उदय खोडके, कार्यक्रम अधिकारी डॉ. रवींद्र शिंदे, डॉ. प्रवीण घाटगे, डॉ. भारत आगरकर, रेल्वे स्थानक अधिक्षक अरविंद इंगोले, पोलीस निरीक्षक विकास झा आदींनी मार्गदर्शन केले. सदरिल “माझी वसुंधरा अभियान” उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन मुंबई यांच्या सुचनेनुसार  राबविण्यात आला. स्वयंसेवक अजिंक्य कदम, धनराज केंद्रे, खुशबू कुमारी, नेहा जाधव, जानव्ही चव्हाण, सौरभ काळे, विश्वजित तिकटे, गायत्री वाणी, दिपाली अवचार, प्राची गोटामी, आरती महाजन, अवंतिका पारवे, क्षितिजा मस्के आदीनी परिश्रम घेतले.