Pages

Monday, June 27, 2022

मौजे वाडीदमई येथे महिला सक्षमीकरण चर्चासत्र संपन्‍न

महाराष्‍ट्र शासनाचा कृषि विभाग, आत्‍मा परभणी आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने दिनांक २७ जून रोजी मौजे. वाडीदमई (जिल्हा परभणी) येथे कृषी संजीवनी महोत्सवांतर्गत महिला सक्षमीकरण चर्चासत्राचे आयोजन करण्‍यात आले होते. कार्यक्रमास प्रमुख वक्‍ते म्‍हणुन विस्‍तार कृषी विद्यावेत्‍ता डॉ. गजानन गडदे हे उपस्थित होते तर अध्यक्षस्‍थानी सरपंच श्रीमती लताबाई तरटे या होत्‍या, उपसरपंच श्री विश्वनाथ तरटे, पोलीस पाटील लक्ष्मण बिडकर, प्रगतशील महिला शेतकरी अनुराधाताई, उत्तमराव तरोटे, बाळासाहेब गायकवाड, दत्तराव गायकवाड, प्रकाश तरोटे, मुंजाजी गायकवाड, गवण मोगरे, अनिताताई आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मार्गदर्शनात डॉ गजानन गडदे म्‍हणाले की, शेतीतील बीज प्रक्रिये पासुन ते काढणी, साठवणुक आदी प्रत्‍येक कामात महिलांचा मोलाचा वाटा असतो, त्‍यामुळे शेतकरी महिलांनी सुधारित तंत्रज्ञान समजुन घ्‍यावे. प्रक्रिया उद्योग, गृह उद्योग आदीच्‍या माध्‍यमातुन कुटुबांला आर्थिक पाठबळ देऊन शकतात, असे सांगुन सोयाबीन लागवड तंत्रज्ञानाबाबत सविस्‍तर मार्गदर्शन केले.

श्रीमती स्वाती घोडके यांनी महिलांना कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत महिला गटस्थापन करण्‍याविषयी मार्गदर्शन केले तर श्रीमती सुप्रिया धबाले संकटग्रस्त महिला निवारण केंद्र सदस्य वन स्टॉप सेंटर यांनी महिलांना महिला निवारण केंद्र विषयी माहिती दिली.  

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आत्‍मा सहाय्यक तंत्रज्ञान व्‍यवस्‍थापक श्रीमती स्वाती घोडके यांनी केले तर आभार कृषी सहाय्यक श्री. एस. जे. आनेराव कृषी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कृषी पर्यवेक्षक श्री. बी. एम. मुंडे, श्रीमती राधा कदम आदी सहकार्य केले.  कार्यक्रमास गावातील महिला शेतकरी, शेतकरी बांधव मोठया संख्‍येने उपस्थित होते.