Pages

Saturday, August 6, 2022

रावे अंतर्गत मौजे जांब येथे खरीप शेतकरी मेळावा संपन्न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील परभणी कृषी महाविद्यालय आणि करडई संशोधन योजना यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण जागरूकता कृषी कार्यानुभव अंतर्गत ५ ऑगस्ट रोजी परभणी तालुक्यातील मौजे जांब येथे खरीप शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सरपंच श्री रामभाऊ रेंगे हे होते  तर प्रमुख पाहुणे म्हणून चेअरमन संग्राम भैय्या जामकर हे उपस्थित होते. व्यासपीठावर विद्यापीठ शास्त्रज्ञ डॉ. अनंत बडगुजर, डॉ. मीनाक्षी पाटील, डॉ. संतोष शिंदे, डॉ. अमोल थोरात, कार्यक्रम अधिकारी डॉ. अंबिका मोरे, ग्रामसेवक पंजाबराव देशमुख, माजी सरपंच संजय स्वामी  आदींची प्रमुख उपस्थिती होती.

अध्यक्षीय भाषणामध्ये श्री संग्रामभैय्या जामकर यांनी शेतकरी बांधवांनी नवनवीन तंत्रज्ञानाची कास धरून शेती व्यवसायात प्रयोगशील राहण्याचे आवाहन केले. डॉ. अनंत बडगुजर यांनी मेळाव्यात खरीप पिकातील कीड व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केले. खरीप पिकातील रोग व्यवस्थापनावर डॉ. मीनाक्षी पाटील, खरीप पिकातील तण व्यवस्थापनावर डॉ. संतोष शिंदे, लिंबूवर्गीय फळांमधील बहार व्यवस्थापनावर डॉ. अमोल थोरात आदींनी मार्गदर्शन केले. विद्यापीठ शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांच्या शेतीविषयक शंकांचे निराकरण केले.

मेळाव्याचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी डॉ. अंबिका मोरे यांनी केले. सूत्रसंचालन कृषीकन्या प्राजक्ता गवळी हिने केले तर आभार श्रुती देशमुख हिने मानले. मेळाव्याचे आयोजन कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सय्यद इस्माईल, रावे कार्यक्रम समन्वयक डॉ. राजेश कदम, रावे सहसमन्वयक डॉ. प्रवीण कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कृषीकन्या गायत्री धानोरकर, वैष्णवी देशमुख, मनस्वी भोयर, प्रीती गरड, स्नेहल चव्हाण, मेघा गिरी,अंजू हेंद्रे, रेणुका गादेवार, वेदिका धुतराज, ऐश्वर्या आंबेकर, अमृता देशमुख, प्रियंका चौरे,प्रियंका ढगे, प्रणिता भोसले ,अखिला, पूजा चंदा आदींनी परिश्रम घेतले. मेळाव्यास शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.