Pages

Monday, September 12, 2022

वनामकृविच्‍या ब्‍लॉगला एक दशक पुर्ण, दहा वर्षात सहा लाख पेक्षा जास्‍त वेळेस वाचन (Blog completed one decade)

८१० पोस्‍ट ब्‍लॉगवर प्रसिध्‍द
आपल्‍या प्रतिसाद व सहकार्य बद्दल शतश: आभार

वसंतराव नाईक मराठवाडा कृ‍षी विद्यापीठाचा जनसंपर्क अधिकारी या नात्‍याने १२ सप्‍टेबर २०१२ मध्‍ये promkvparbhani.blogspot.com हा ब्‍लॉग सुरू करून आज एक दशक म्‍हणजेच दहा वर्ष पुर्ण झाले. या दहा वर्षात हा ब्‍लॉग सहा लाख पेक्षा जास्‍त वेळेस पाहीला वाचला गेलाआजपर्यंंत विद्यापीठाच्‍या ८१० बातम्‍या, पोस्‍ट, घडामोडींची माहिती छायाचित्रासह ब्‍लॉगवर प्रसिध्‍द करण्‍यात आल्‍या, म्‍हणजेच दरमाह साधरणत: १५ पोस्‍ट प्रसिध्‍द होतात. यास वाचकांनी भरभरून असा प्रतिसाद दिला, विशेषत: या विविध बातम्‍यास प्रसारमाध्‍यमाच्‍या प्रतिनिधींनी आपआपल्‍या दैनिकात, साप्‍ताहिक, मासिक तसेच इलेक्‍ट्रानिक माध्‍यमात मोठी प्रसिध्‍दी दिली, त्‍यामुळे लाखो लोकांपर्यंत ही सर्व माहिती पोहचण्‍यास मोठी मदत झाली. सदरिल प्रसिध्‍द केलेल्‍या पोस्‍ट या विद्यापीठातील विविध घडामोडी, कृषि तंत्रज्ञान, कृषि सल्‍ला, कृषि हवामान अंदाज, कृषि संशोधन, विद्यापीठ उपलब्‍धी आदींशी संबंधीत आहेत. सदरिल ब्‍लॉगचा शेतकरी बांधव, विद्यार्थी, सामान्‍य नागरीक ही वाचक असुन कृषि तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत त्‍वरित पोहोचविण्‍यास मदत होत आहे.

सदरिल ब्‍लॉअविरत कार्यरत राहण्‍यास विद्यापीठाचे या दहा वर्षातील सर्व सन्‍माननीय कुलगुरू, विस्‍तार शिक्षण संचालक, शिक्षण संचालक, संशोधन संचालक कुलसचिव यांचे मोलाचे मार्गदर्शन प्रोत्‍साहन लाभले. तसेच विद्यापीठांतर्गत असलेले विविध संशोधन केंद्रे, महाविद्यालये, विद्यालये, कृषि विज्ञान केंद्रे, विविध कार्यालये येथील अधिकारी, कर्मचारी, शास्‍त्रज्ञ विद्यार्थी यांचे मोठे योगदान आहे. ब्‍लॉग लिखाणात सातत्‍य राहीले, ते सर्व वाचक वर्गाच्‍या प्रतिसादामुळेच.  

गेल्‍या दशकातील विद्यापीठाच्‍या विविध घडामोडीचा सदरिल ब्‍लॉग हे साक्ष असुन आजही कोणतीही मागील घडामोडी बातम्‍या छायाचित्रासह आपण पाहु शकतो, हे सर्वांच्‍या सहकार्यामुळेच शक्‍य होऊ शकले. विद्यापीठाचा जनसंपर्क अधिकारी या नात्‍याने सर्वांचे शतश: आभार, या पुढेही आपला असाच प्रतिसाद सहकार्य लाभो, हीच अपेक्षा.

धन्‍यवाद

आपला स्‍नेहांकित

जनसंपर्क अधिकारीवनामकृविपरभणी