Pages

Tuesday, September 13, 2022

वनामकृवित शनिवारी रबी शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन

राज्‍याचे माननीय कृषिमंत्री मा. ना. श्री. अब्‍दुल सत्‍तार यांच्‍या हस्‍ते मेळाव्‍याचे उदघाटन

मराठवाडा मुक्‍ती संग्राम दिनाचे  औजित्‍य साधुन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विस्‍तार शिक्षण संचालनालय कृषि विभाग (महाराष्‍ट्र शासन) यांचे संयुक्‍त विद्यमाने रबी शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन दिनांक १७ सप्‍टेंबर रोजी दुपारी २.०० वाजता कृषी महाविद्यालयाच्‍या सभागृहात करण्‍यात ले असुन मेळाव्‍याचे उदघाटन महाराष्‍ट्र राज्‍याचे माननीय कृषिमंत्री तथा विद्यापीठाचे प्रति कुलपती मा. ना. श्री. अब्‍दुल सत्‍तार यांच्‍या हस्‍ते होणार आहे.

कार्यक्रमास विशेष अतिथी म्‍हणुन माजी कुलगुरू मा डॉ वेदप्रकाश पाटील आणि कृषि उद्योजक तथा महिकोचे विश्‍वस्‍त मा श्री. राजेंद्र बारवाले हे उपस्थित राहणार असुन कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा. डॉ. इन्‍द्र मणि हे राहणार आहेत. मेळाव्‍यास राज्‍यसभा सदस्‍य मा. खा. श्रीमती फौजिया खान, परभणी लोकसभा सदस्‍य मा खा श्री संजय जाधव, विधान परिषद सदस्‍य मा. आ. श्री. सतिश चव्‍हाण, विधानपरिषद सदस्‍य मा. आ. श्री. बाबाजानी दुर्राणी, विधान परिषद सदस्‍य मा. आ. श्री. विक्रम काळे, विधान परिषद सदस्‍य मा. आ. श्री. विप्‍ल बाजोरिया, परभणी विधानसभा सदस्‍य मा. आ. डॉ. राहुल पाटील, पाथरी विधानसभा सदस्‍य मा. आ. श्री. सुरेश वरपुरकर, जिंतुर विधानसभा सदस्‍य मा. आ. श्रीमती मेघनाताई बोर्डीकर, गंगाखेड विधानसभा सदस्‍य मा. आ. डॉ. रत्‍नाकर गुट्टे आदींची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

याप्रसंगी कृषि तंत्रज्ञानावर आधारित विविध दालनाचा समावेश असलेल्‍या कृषि प्रदर्शनीचेही आयोजन करण्‍यात आले असुन तांत्रिक चर्चासत्रात रबी पिक लागवड, पिकांवरील किड-रोग व्‍यवस्‍थापन दींवर विद्यापीठ शास्‍त्रज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. तसेच विद्यापीठ विकसित विविध रबी पिकांच्‍या बियाणे विक्रीचे उदघाटन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात येणार आहे. दरिल मेळाव्‍यास जास्‍तीत जास्‍त शेतकरी बांधवांनी उपस्थित राहण्‍याचे आवाहन विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, लातुर विभागीय कृषि सहसंचालक श्री. साहेबराव दिवेकर, आणि औरंगाबाद विभागीय कृषि सहसंचालक श्री. दिनकरराव जाधव यांनी केले आहे.