Pages

Monday, October 10, 2022

ताडलिमला येथे कापूस संशोधन योजना तर्फे जागतिक कापूस दिवस साजरा

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कापूस संशोधन योजन येथील किटकनाशक प्रतिकारशक्ती व्यवस्थापन प्रकल्प (आयआरएम) द्वारे निवड केलेल्या पाच गावापैकी ताडलिमला ता.जि.परभणी येथे जागतिक कापूस दिवस दिनांक ७ ऑक्‍टोवर रोजी साजरा करण्यात आला. यावेळी गटचर्चा आणि प्रक्षेत्र भेट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शेतकरी बांधवाना योजनाचे प्रभारी अधिकारी कापूस कृषी विद्यावेत्ता डॉ. अशोक जाधव व प्रकल्प समन्वयक किटकशास्त्रज्ञ डॉ. दिगंबर पटाईत यांनी मार्गदर्शन केले. डॉ. अशोक जाधव यांनी कापूस लागवडीमध्ये शेंडा खुडणे तसेच गळ फांद्या काढून योग्य खत व्यवस्थापनाद्वारे उत्पादनात कशी वाढ करता येईल याविषयी मार्गदर्शन केले. तर डॉ. दिगंबर पटाईत यांनी कपाशी मधील कीड व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले. प्रकल्पातील १० शेतकऱ्यांना निमार्क, प्रोफेनोफॉस आणि फ्लोनिकॅमिड या निविष्ठा वाटप करण्यात आल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संशोधन सहयोगी श्री.ज्ञानेश्वर इंगळे यांनी केले. गावातील श्री.बबनराव पेडगे, श्री.शिवाजी चव्हाण, श्री.पाराजी आव्हाड, श्री.वैजनाथ आव्हाड, श्री.श्रीकांत कुटे, श्री.भागोजी जोगदंड, श्री.आकाश नवले व श्री.रणजित चव्हाण यांची उपस्थिती होती. प्रगतशील शेतकरी श्री. बबनराव पेडगे यांच्या कापूस प्रक्षेत्रास भेट देऊन पाहणी करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री.नारायण ढगे, प्रक्षेत्र सहाय्यक, कापूस संशोधन योजना यांनी परीश्रम घेतले.

कीटकनाशक प्रतिकारशक्ती व्यवस्थापन प्रकल्प हा कुलगुरू मा डॉ. इन्‍द्र मणि आणि संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर यांच्या मार्गदर्शनाखाली परभणी जिल्ह्यातील बाभळगाव, बोरगव्हाण व टाकळगव्हाण ता.पाथरी आणि ताडलिमला व परळगव्हाण ता. परभणी या गावांमध्ये केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर यांच्या सहकार्याने राबविण्यात येत आहे. प्रकल्पाअंतर्गत प्रति गाव १० शेतकरी याप्रमाणे एकूण ५० शेतकऱ्यांच्या शेतावर गुलाबी बोंडअळी व्यवस्थापनाची प्रात्यक्षिके घेण्यात आली आहेत. त्यामध्ये शेतकऱ्यांना जैविक कीटकनाशके, ट्रायकोकार्डस, कामगंध सापळे आणि रासायनिक कीटकनाशके यासारख्या निविष्ठा वाटप करण्यात येत आहेत.