वनामकृविच्या वतीने
पाच ठिकाणी करण्यात आले होती थेट प्रक्षेपणाची सुविधा
पुसा (नवी दिल्ली) येथील भारतीय कृषी संशोधन संस्थेत केंद्र सरकारच्या कृषि आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने दोन दिवसीय पीएम किसान सन्मान संमेलन २०२२ चे दिनांक १७ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान मा श्री नरेंद्र मोदी यांच्या ह्रस्ते उदघाटन झाले. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि महाविद्यालयाच्या सभागृहात ठेवण्यात आले होते. तसेच विद्यापीठांतर्गत असलेल्या औरंगाबाद, तुळजापुर, बदनापुर आणि खामगांव येथील कृषि विज्ञान केंद्रात शेतकरी बांधवाना थेट प्रक्षेपण पाहण्याची सोय करण्यात आली होती. यात १८९५ व्यक्तींनी सहभाग नोंदविला, यात शेतकरी बांधव, महिला शेतकरी, विद्यापीठातील अधिकारी, शास्त्रज्ञ, प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यां याचा समावेश होता.
संपुर्ण देशातुन या कार्यक्रमाचा लाभ विविध संस्थांमधुन एक कोटीहुन अधिक शेतकरी या कार्यक्रमाला आभासी पध्दतीने उपस्थित होते. यात संशोधक, धोरणकर्ते आणि इतर कृषिशी निगडीत भागधारकांचा समावेश होता. रसायने आणि खते मंत्रालयाच्या अंतर्गत ६०० पंतप्रधान किसान समृध्दी केंद्राचे उदघाटन माननीय पंतप्रधान यांच्या हस्ते करण्यात आले. या योजनेंतर्गत देशातील खतांची किरकोळ दुकाने टप्प्याटप्प्याने या योजनेमध्ये रूपांतरित केली जाणार आहे. याव्दारे शेतक-यांच्या विविध प्रकारच्या गरज पुर्ण करण्यात येणार आहे. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते शेतक-यांच्या कल्याणासाठीच्या पंतप्रधान सन्मान योजने च्या १२ व्या हप्त्याचे १६००० कोटी रूपये डिबीटी व्दारे वितरित करण्यात आले. कार्यक्रमात पंतप्रधान भारतीय जन उर्वरक परियोजना एक देश एक खत योजनेचेही उदघाटन केले.
मार्गदर्शनात माननीय पंतप्रधान मा श्री नरेंद्र मोदी म्हणाले की, किसान समृद्धी केंद्र हे केवळ शेतकर्यांसाठी खत खरेदी-विक्रीचे केंद्र नाही, तर शेतकर्यांना नाते दृढ करणारी केंद्र असुन प्रत्येक गरजेच्या वेळी मदत करणारे केंद्र आहे. वन नेशन, वन खतामुळे शेतकऱ्याची सर्व प्रकारच्या संभ्रमावस्थेतून सुटका होणार आहे आणि चांगले खतही उपलब्ध होणार असल्याचे ते म्हणाले.
परभणी कृषि महाविद्यालयातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात व्यासपीठावर शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, कुलसचिव डॉ धिरजकुमार कदम, प्राचार्य डॉ सय्यद ईस्माइल, प्राचार्य उदय खोडके, प्राचार्य डॉ गिरीधर वाघमारे, कृषि अधिकारी श्री बी एस कच्छवे आदींची उपस्थिती होती. यावेळी शेतकरी प्रतिनिधी म्हणुन श्री नरहरी शिंदे, श्री गंगाधर शिंदे, महिला शेतकरी श्रीमती अनुराधा कटारे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्य्रक्रमाचे प्रास्ताविकात डॉ देवराव देवसरकर यांनी विद्यापीठ विकसित विविध वाणांची माहिती देऊन शेतकरी बांधवानी शेती पुरक व्यवसाय करण्याचे आवाहन केले. विद्यापीठ शास्त्रज्ञ डॉ गजानन गडदे , डॉ डि के पाटील यांनी रबी पीक लागवड तंत्रज्ञानावर मार्गदर्शन केले तर श्री बी एस कच्छवे यांनी कृषि विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ प्रशांत देशमुख यांनी केले तर आभार डॉ गजानन गडदे यांनी मानले.