Public Relations Officer,
Directorate of Extension Education,
Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth,
Parbhani - 431 402 (M.S.)
(Maharashtra) INDIA
Pages
▼
Saturday, November 12, 2022
इंद्रधनुष्य युवक महोत्सव स्पर्धेत वनामकृविचे यश
सन २०२२-२३ मध्ये
महाराष्ट्रातील कृषि विद्यापीठांचे माननीय कुलपती तथा राज्यपाल मा श्री भगत सिंह
कोश्यारी यांच्या मार्गदर्शनाखाली १८ वी राज्यस्तरीय आंतर विद्यापीठ युवक
महोत्सव - इंद्रधनुष्य स्पर्धा दिनांक ५ ते ९ नोव्हेंबर दरम्यान राहुरी येथील
महात्मा फुले कृषि विद्यापीठात पार पडल्या. या स्पर्धेतील समुहगीत, सुगम गायन, फाईन
आर्ट, स्कीट, माईम, मिमिक्री आदी विविध स्पर्धा प्रकारात वसंतराव नाईक मराठवाडा कृषि
विद्यापीठाचे संघ सहभागी झाले होते. यात विद्यापीठाच्या संघाने व्यंगचित्र
प्रकारात रौप्यपदक, माईम नाटय प्रकारात रौप्यपदक, तर प्रश्नमंजुषेमध्ये कास्य पदक प्राप्त करून घवघवीत यश संपादन
केले. या संघात १० विद्यार्थ्यांचा समावेश होताव्यंगचित्रात
संदीप भुसारे याने रौप्यपदक प्राप्त केेेले, माईम संघात
सिध्देश्वर जाधव, अभिषेक देवव्दारे, शडानन शिराळे, अभिजित गर्वे, अंकिता मोरे, कृष्णाई इनामदार यांचा सहभाग
होता, तर प्रश्नमंजुषा मध्ये विशाल किटले, शुभम काळे, नागेश निर्मले या विद्यार्थ्यांचा
समावेश होता. संघ व्यवस्थापक म्हणुनडॉ. आशा देशमुख, डॉ. विजय सावंत आणि डॉ. रामप्रसाद मोरे यांनी कार्य केले.या यशाबाबत कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि, शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, कुलसचिव
डॉ धिरजकुमार कदम, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ सचिन
मोरे यांनी यशस्वी विद्यार्थी-विद्यार्थींनीचे व संघव्यवस्थापक यांचे अभिनंदन
केले.