Pages

Saturday, December 3, 2022

परभणी कृषि महाविद्यालयात स्‍पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीर संपन्‍न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषी महाविद्यालयाच्‍या रोजगार व समुदेशन कक्षाच्या वतीने दिनांक २ डिसेंबर रोजी एकदिवसीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीर संपन्‍न झाले. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी प्राचार्य डॉ. सय्यद इस्माईल हे होते तर प्रमुख वक्‍ते औरंगाबाद येथील संकल्प क्लासेसचे संचालक श्री आकाश जाधव हे उपस्थित होते. व्‍यासपीठावर कक्षाचे अध्‍यक्ष डॉ पी आर झंवर, विभाग प्रमुख कृषी अभियांत्रिकी डॉ आर जी भाग्‍यवंत, कक्षाचे सचिव डॉ रणजित चव्‍हाण आदींची प्रमुख उपस्थिती होती.  

शिबिरात पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी बँकिंग सेवा व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षा संदर्भात औरंगाबाद येथील संकल्प क्लासेसचे संचालक श्री आकाश जाधव यांनी मार्गदर्शन केले. पहिल्‍या सत्रात विविध स्‍पर्धा परीक्षांची पूर्वतयारी व त्यासंदर्भात मार्गदर्शन केले तर दुसऱ्या सत्रात बुद्धिमत्ता चाचणी आणि अंकगणित याचे महत्त्व सांगून विविध क्लृप्त्या वापरून सोप्या पद्धतीने व कमी वेळात उत्तरे तयार करण्‍याच्‍या पध्‍दतीबद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षण प्रभारी डॉ. रणजीत चव्हाण यांनी केले. शिबीरामध्‍ये महाविद्यालयातील ५०० पेक्षा विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.