Pages

Friday, December 9, 2022

वनामकृवित आयोजित मधुमक्षिका पालन उद्योग कौशल्य प्रमाणपत्र अभ्यासक्रमास अर्ज करण्याचे आवाहन

परभणी जिल्हयातील ग्रामीण युवकांकरीता महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत किमान कौशल्य विकास कार्यक्रम २०२२-२०२३ (सर्वसाधारण जिल्हास्तरीय योजना) परभणीच्या वतीने वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषी किटकशास्त्र विभागात तीन महिण्याचा (१८० तास) मधुमक्षिका पालन उद्योग प्रमाणपत्र अभ्यासक्रम (कोर्स) सुरु करण्यात येत असुन याकरीता नावनोंदणी चालू आहे. याकरीता पाचवी पास आणि ३ वर्षाचा शेती / शेती पुरक व्यवसायाचा अनुभूव किंवा आठवी पास आणि १ वर्षाचा शेती / शेती पुरक व्यवसायाचा अनुभव असलेले परभणी जिल्हयातील १८ ते ४५ वयोगटातील ग्रामीण युवक पात्र असुन सदर कोर्स करीता अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तरी अधिक माहिती करीता कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्य्क आयुक्त श्री प्रशांत खंदारे (9420788747) व श्री दिक्षीत (9890828797) किंवा कृषि कीटकशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. पी. एस. नेहरकर, डॉ. एम. एम. सोनकांबळे (9423438031), श्री. अनुराग खंदारे (9930050914) यांच्याशी संपर्क साधावा.