Public Relations Officer,
Directorate of Extension Education,
Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth,
Parbhani - 431 402 (M.S.)
(Maharashtra) INDIA
Pages
▼
Monday, March 6, 2023
मौजे येळंबघाट (ता जि बीड) येथे वनामकृवि विकसित ज्वारीचे ‘परभणी शक्ती’ वाणांची पाहणी
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ विकसित देशातील
ज्वारीचे पहिले जैवसंपृक्त ‘परभणी शक्ती’ या वाणाची लागवड मौजे येळंबघाट (ता जि बीड) येथील शेतकरी श्री राम कदम यांनी केली असुन
सद्यस्थितीत सदर पिक चांगल्या परिस्थितीत आहे. या प्रक्षेत्रास विद्यापीठाचे विस्तार
शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर यांनी दिनांक १ मार्च रोजी भेट देऊन पाहणी केली. यावेळी
ज्वार पैदासकार डॉ एल एन जावळे, डॉ सुर्यवंशी, सरपंच श्री दिनेश कदम, उमेश चादर, संतोष कदम, सुधाकर कदम आदीसह गांवकरी उपस्थित होते. यावेळी
मार्गदर्शनात डॉ देवसरकर यांनी शेतकरी बांधवांनी जमिनीच्या प्रकारानुसार योग्य वाणांची निवड करण्याचासल्ला दिला तर डॉ एल एन जावळे यांनी परभणी शक्ती
वाणात इतर ज्वारीच्या वाणापेक्षा जास्त लोह व जस्त असुन मानवी स्वास्थकरिता उपयुक्त
असे सांगितले. डॉ सुर्यवंशी यांनी विविध पिक लागवडीबाबत माहिती दिली. श्री दिनेश कदम
यांनी आभार मानले.