याप्रसंगी कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शुभेच्छा देतांना म्हणाले की, डॉ बाबासाहेब यांचे जीवन मोठे संघर्षमय होते, त्यांनी कठीन परिश्रमाव्दारे अध्ययन करून जगातील ज्ञान प्राप्त केले. ते एक ज्ञानी पुरूष, विकास पुरूष व शिक्षण पुरूष होते. त्यांचे विचार आजही जीवंत आहेत. त्यांनी दाखविलेल्या मार्गाचा अवलंब केल्यास देशाचा विकास होईल, विद्यार्थ्यांनी त्यांच्या चरित्रांचे व विचारांचे मंथन केले पाहिजे, त्यांचे विचार आचरणात आणले पाहिजेत, जीवनात यशस्वी होण्याकरिता दुरदृष्टी ठेऊन विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम केले पाहिजे. समाज बांधणी मध्ये आपले योगदान दिले पाहिजे, असा सल्ला देवुन त्यांनी जयंती निमित्त विद्यार्थ्यांनी राबविलेल्या सतत अठरा तास अभ्यास उपक्रमाचे कौतुक केले.
यावेळी विद्यापीठाच्या वतीने ढोलताश्याच्या गजरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब
आंबेडकर यांच्या प्रतिमेची मिरवणुक काढण्यात आली. कार्यक्रमास विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थींनी
मोठ्या संख्येने उपस्थित होते.