जागतिक रक्तदाता दिवसानिमित्त परभणी कृषि महाविद्यालय आणि श्री
शिवाजी महाविद्यालया यांच्या राष्ट्रीय
छात्रसेना विभागाच्या वतीने दिनांक १४
जून रोजी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे
उदघाटन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ. इन्द्र मणि यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले आणि प्राचार्य डॉ. सय्यद इस्माईल यांची प्रमुख उपस्थिती होती. कुलगुरू मा.डॉ. इन्द्र मणि यांनी रक्तदान हे श्रेष्ठदान
असुन समाज सेवा करण्याची संधी असल्याचे सांगुन रक्तदाते छात्रसैनिकांचे अभिनंदन
केले. शिबिरामध्ये
एकूण ३४ छात्रसैनिकांनी स्वयंस्फूर्तीने
रक्तदान केले. विद्यापीठातील विविध विभागाचे विभाग प्रमुख, जिमखाना उपाध्यक्ष, हवालदार श्री संजय घोष व एनसीसीचे
कॅडेट्स मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिबिराचे नियोजन लेफ्टनंट डॉ. जयकुमार
देशमुख व लेफ्टनंट डॉ. प्रशांत सराफ यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेकरिता फर्स्ट ऑफिसर श्री.
जयपूरकर,
सरकारी रक्तपेढीची संपूर्ण पथक आणि अंडर ऑफिसर ऋषभ रणवीर, कॅडेट्स वैभव, श्रीकृष्ण, गायत्री, विद्या, धनराज, प्रसन्न, प्रकाश, अविराज, अभय
यांनी परिश्रम केले.
Public Relations Officer, Directorate of Extension Education, Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth, Parbhani - 431 402 (M.S.) (Maharashtra) INDIA
Pages
▼