वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्प (नाहेप) च्या वतीने
दिनांक २२ जुन रोजी कृषि क्षेत्रात डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर यावर भारतीय कृषि संशोधन
संस्थेचे कृषि भौतिकशास्त्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ रबी साहू यांचे दिनांक २२ जून रोजी आयोजीत करण्यात आले
होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू मा.
डॉ. इन्द्र मणि हे होते.
डॉ. आर. एन. साहू म्हणाले की, विद्यार्थ्यांना आपल्या विषयांची चांगल्या प्रकारे माहिती असणे आवश्यक असुन जगातील अत्याधुनिक तंत्रज्ञान शेतीत वापराबाबत ज्ञान प्राप्त करावे. येणा-या काळात शेतीत रिमोट सेन्सिंग व ड्रोन टेक्नॉलॉजीचा वापर मोठया प्रमाणात होणार आहे. विद्यापीठ शास्त्रज्ञांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध संशोधन प्रकल्प मिळविण्याकरिता प्रयत्न करण्याचा सल्ला त्यांनी दिला.
मार्गदर्शनात कुलगुरु मा डॉ इन्द्र मणि म्हणाले की, डिजिटल तंत्रज्ञानात
डॉ. आर. एन. साहू यांचे मोठे संशोधन असुन त्यांच्या ज्ञानाचा लाभ विद्यापीठातील शास्त्रज्ञ
व विद्यार्थ्यांनी घेऊन नाहेप प्रकल्प माध्यमातुन विविध सेन्संर आणि आधुनिक साधनांचा
वापर संशोधनास करावा.
सुत्रसंचालन डॉ. कैलास डाखोरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी नाहेप प्रकल्पाचे मुख्य अन्वेषक डॉ. गोपाळ यु. शिंदे, डॉ गोदावरी पवार, डॉ. के. के. डाखोरे, डॉ. विशाल इंगळे, प्रा. डी. व्हि. पाटील, डॉ. अनिकेत वाईकर, डॉ. शिवराज शिंदे, इंजि. श्रध्दा मुळे, इंजि. अंजिक्य ब्रम्हनाथकर, इंजि. शिवानंद शिवपुजे, इंजि. पोर्णिमा राठोड, इंजि. तेजस्विनी कुमावत, इंजि. संजिवनी कानवटे, मुक्ता शिंदे, नमीता विडोळकर हनुमंत शिराळे, नितीन शहाणे, मारोती रणेर, जगदीश माने यांनी परीश्रम घेतले. कार्यमक्रमाची कृषि विद्यापीठातील पदयुत्तर व आचार्य पदवी कृषि व कृषि अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थी तसेच शास्त्रज्ञ यांची मोठया प्रमाणात उपस्थिती होती.