Pages

Thursday, July 6, 2023

आदिवासी उपयोजनेतर्गत मौजे वाळक्याची वाडी ज्‍वारीचे वाण परभणी शक्ती बियाण्‍याचे वाटप

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील ज्वार संशोधन केंद्र आणि भारतीय भरडधान्य संशोधन संस्था, राजेंद्रनगर (हैद्राबाद) यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी उपयोजने अंतर्गत आंतरराष्ट्रीय भरडधान्याचे औचित्य साधुन आदिवासी लोकांच्या दैनंदिन आहारात भरडधान्याचा वापर व्हावा व उत्पादनात वाढ व्हावी या उद्देशाने ज्वार संशोधन केंद्राच्‍या मार्फेत दिनांक ३ जुलै रोजी ज्वारीचे जैवसमृध्द वाण परभणी शक्ती आणि जैविक बुरशीनाशक ट्रायकोबुस्ट या निविष्ठांचा मौजे वाळक्याची वाडी (ता. हिमायतनगर,जिल्हा नांदेड) येथील आदिवासी शेतकरी बांधवा वाटप करण्यात आले. यावेळी केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. एल. एन. जावळे यांनी परभणी शक्ती या वाणाचे वैशिष्टये, आरोग्य दृष्टीकोणातील महत्व याविषयी मार्गदर्शन केले. सहाय्यक ज्वार कृषिविद्यावेत्ता प्रा. प्रितम भुतडा यांनी भरडधान्य पिकांचे आदिवासी लोकांकरिता असलेले महत्व व संधी,दैनंदिन आहारातील महत्व आणि लागवड तंञज्ञान याविषयी मार्गदर्शन केले.

सदर परभणी शक्‍ती वाणात इतर ज्‍वारीच्‍या वाणापेक्षा लोह व जस्‍ताचे प्रमाण अधिक असल्‍यामुळे आदिवासी भागातील महिला व मुलांमधील कुपोषण कमी होण्‍यास मदत होऊ शकते. कार्यक्रमास गावातील शेतकरी बांधव व महिला उपस्थित होत्या. सुञसंचलन उपसरपंच श्री संजय मोदाळकर यांनी केले तर आभार तलाठी श्री. दिलीप मेटलवाड यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेकरिता श्री माणिक जोंधळे आणि श्री. मोसीन तसेच गावाचे ग्रामसेवक यांनी प्रयत्न केले.