Pages

Tuesday, September 5, 2023

वनामकृवितील नाहेप अंतर्गत शास्‍त्रोक्‍त लेखन व भाषा क्षमता कार्यशाळेस सुरूवात

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्प (नाहेप) वतीने  शास्त्रोक्त लेखन आणि भाषा क्षमता यावर दिनांक ५ ते ८ सप्‍टेंबर दरम्‍यान चार दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्‍यात आले असुन दिनांक ५ सप्‍टेंबर रोजी कार्यशाळेचे उदघाटन कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. व्‍यासपीठावर हैद्राबाद येथील राष्ट्रीय कृषि संशोधन व्यवस्थापन संस्थेचे माजी संचालक डॉ. अन्वर, विशेष अतिथी म्हणून शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, प्राचार्य डॉ. भगवान असेवार, आयोजन सचिव डॉ वीणा भालेराव यांची उपस्थिती होती.   

अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ. इन्द्र मणि म्हणाले की, प्रत्येक व्यक्तीमध्ये नेतृत्वगुण असतात त्याकरिता उत्कृष्ट लेखन व संभाषन क्षमता आवश्यक आहे. विद्यापीठाचे मानांकन वाढीकरिता दर्जेदार संशोधन लेखांचे लेखन करून आंतरराष्‍ट्रीय पातळीवरील जर्नल मध्‍ये प्रकाशित करण्‍याची गरज आहे.

शास्त्रोक्त लेखना विषयी बोलतांना डॉ. अन्वर म्हणाले की, लेखन हे स्वंय स्पष्ट, निखळ असावे तसेच संभ्रमित करणारे नसावे. प्रत्येक व्यक्तीच्या प्रभावी संभाषण कौशल्यांकरीता सुदृढ शरीर, सदृढ मन, अध्यात्मीकता तसेच सामाजिक सहकार्याची भावना आवश्यक आहे.

प्रास्‍ताविकात डॉ. भगवान सेवार यांनी कार्यशाळेबाबत माहिती दिली. सुत्रसंचालन आयोजन सचिव डॉ. वीणा भालेराव यांनी केले. विद्यार्थी व प्राध्यापक यांच्या लेखन क्षमता वृध्दींगत करणे, प्रभावीपणे शास्त्रोक्त पत्रिका लेखन तसेच भाष कौशल्यांमध्ये अधिक प्रगल्भता आणण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेत ८० आचार्य पदवी विद्यार्थी तसेच विद्यापीठातील प्राध्यापक यांनी सहभाग नोंदविला आहे. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी डॉ. मेघा जगताप, इंजि. संजय पवार, डॉ. शिवराज शिंदे, इंजि. तनझीम खान, इंजि. गोपाळ रणेर, इंजि. अक्षय गायकवाड, रामदास शिंपले, नितीन शहाणे, मारोती रणेर, जगदीश माने, गंगाधर जाधव आदीं सहकार्य केले.