Pages

Sunday, October 1, 2023

स्‍वच्‍छता प्रत्‍येकाच्‍या जीवनशैलीचा एक विभिन्‍न अंग असला पाहिजे ....... कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि

वनामकृवित विविध महाविद्यालयात व कार्यलयात राबविण्‍यात आली स्‍वच्‍छता मोहिम 


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील राष्‍ट्रीय सेवा योजने अंतर्गत कृषि महाविद्यालय, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालय, उद्यानविद्या महाविद्यालय, कृषि अन्‍नतंत्रज्ञान महाविद्यालय आणि सामुदायिक विज्ञान महाविद्यालय यांच्‍या वतीने महात्‍मा गांधी यांच्‍या जयंती निमित्‍त स्‍वच्‍छ भारत मिशन आणि एक तारीख – एक तास मोहिम दिनांक १ ऑक्‍टोबर रोजी राबविण्‍यात आली. विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांच्‍या अध्‍यक्षतेखाली मार्गदर्शनाखाली संपुर्ण विद्यापीठात स्‍वच्‍छता मोहिम राबविण्‍यात आली. कार्यक्रमास शिक्षण संचालक डॉ उदय खोडके, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माईल, प्राचार्य डॉ व्ही. एस. खंदारे, प्राचार्या डॉ जया बंगाळे, प्राचार्य डॉ राजेश क्षीरसागर, क्रीडा अधिकारी डॉ आशा देशमुख आदीसह विविध विभागाचे विभाग प्रमुख, रासेयोचे कार्यक्रम अधिकारी, स्‍वयंसेवक मोठया संख्‍येने उपस्थित होते.   

मार्गदर्शनात कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि म्‍हणाले की, स्‍वत: कचरा न करणे हीच स्‍वच्‍छता असुन प्रत्‍येकांने स्‍वच्‍छतेबाबत सजग राहावे. आपले घर, आपला परिसर, आपले महाविद्यालय, आपले राज्‍य, आणि आपला देश स्‍वच्‍छता राखण्‍याची जबाबदारी प्रत्‍येकांची आहे. स्‍वच्‍छता हा मनुष्‍याच्‍या आरोग्‍याशी व सामाजिक स्वास्थ्याशी निगडीत आहे. महात्‍मा गांधीने देशाच्‍या स्‍वातंत्र इतकेच स्‍वच्‍छतेला महत्‍व दिले. स्‍वच्‍छता हा आपल्‍या दिनचर्याचा भाग झाला पाहिजे. स्‍वच्‍छता आपल्‍या जीवनशैलीचा विभिन्‍न अंग असला पाहिजे, असा सल्‍ला त्‍यांनी दिला.

यावेळी विद्यापीठातील विविध महाविद्यालये, विद्यालये, वसतीगृहे, संशोधन केंद्र, कार्यालये आदी परिसरामध्‍ये स्‍वच्‍छता मोहिम राबविण्‍यात आली. कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्‍यांनी स्‍वच्‍छतेवर आ‍धारित पथनाटये सादरीकरण केले. उपक्रम यशस्‍वीतेकरिता क्रीडा अधिकारी डॉ आशा देशमुख, रासेयोचे कार्यक्रम अधिकारी डॉ संजय पवार, डॉ रवि शिंदे, डॉ प्रविण घाटगे, डॉ विद्याधर मनवर आदींच्‍या मार्गदर्शनाखाली स्‍वयंसेवकांनी परिश्रम घेतले.